Home विदर्भ राज्य स्लिंगशॉट संघटनेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी...

राज्य स्लिंगशॉट संघटनेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले मार्गदर्शन

212

विनोद पञे

यवतमाळ  – स्लिंगशॉट असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची प्रथम वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी 1 नोवेम्बर ला ऑनलाइन घेण्यात आली. स्लिंगशॉट स्पोर्ट्स असोसिएशन महाराष्ट्र अध्यक्ष बिपीन चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली या सभेचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य मार्गदर्शक म्हणून इंडियन स्लिंगशॉट स्पोर्ट्स फेडरेशनच्या सचिव लता शर्मा, यवतमाळ जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक अब्दुल समद, राज्य क्रीडा महासंघाचे राज्य कार्यकारिणी सदस्य निलेश भगत हे उपस्थित होते जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुस्ताक यांनी स्लिंग शॉट हा खेळ शालेय स्तरावर आणण्यासाठी राज्य संघटनेला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. तर निलेश भगत यांनी गनिमी कावाचे जनक मलिक अंबर, व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळापासून लोकप्रिय असलेला गुलेर हा खेळ आधुनिक स्लिंगशॉट या स्वरूपात लवकरच पसंतीस उतरेल असा विश्वास व्यक्त केला. लता शर्मा यांनी या खेळाला राज्यात नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार प्रसार करण्याची आवश्यकता बोलून दाखवली.
ऑनलाइन सभेत स्लिंग शॉट खेळाचा प्रचार-प्रसार, पंच प्रशिक्षण व परीक्षा, कार्य शाळा, स्पर्धेचे आयोजन याबाबत चर्चा करण्यात आली.
ऑनलाइन सभेला 24 जिल्ह्यातील जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते राज्य संघटनेचे सचिव विकास शेळके यांनी ऑनलाइन सभेचे संचालन केले तसेच माणिक राज लांडगे राज्य उपाध्यक्ष यांनी खेळाबद्दल मार्गदर्शन केले व आभार सुनील शिंदे सर यांनी मानले. या सभेला राज्य संघटनेचे सदस्य गिरीराज गुप्ता, सुरज कडुकार आदी उपस्थित होते