Home मराठवाडा घनसावंगी तालुका काँग्रेसच्या वतीने उद्या धरणे आंदोलन

घनसावंगी तालुका काँग्रेसच्या वतीने उद्या धरणे आंदोलन

220

 

घनसावंगी – लक्ष्मण बिलोरे

केंद्रातील भाजप सरकारने संसदेत शेतकरी व कामगार विरोधी कायदा लागू करू नये ,या व इतर मागण्यांसाठी घनसावंगी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने २ ऑक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता घनसावंगी तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे काँग्रेस तालुकाध्यक्ष विष्णुपंत कंटूले यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.
यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख यांच्या आदेशानुसार केंद्रातील भाजप सरकारने संसदेत शेतकरी व कामगार विरोधी कायदा लागू करू नये या व इतर मागण्यांसाठी घनसावंगी तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने घनसावंगी येथील तहसील कार्यालया समोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. भाजप सरकारने संसदेत हिटलर शाही पद्धतीने शेतकरी विधेयक मंजूर करून लोकशाहीचा खून केला आहे. या कायद्यामुळे देशातील शेतकरी उद्ध्वस्त होणार असून शेतकऱ्यांना न्याय द्यावा या व इतर मागण्यासाठी तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन तालुकाध्यक्ष विष्णुपंत कंटूले यांनी केले आहे.