Home जळगाव कृषी व कामगार विधेयक , कायदे रद्द करा – मानियार बिरादरीची मागणी

कृषी व कामगार विधेयक , कायदे रद्द करा – मानियार बिरादरीची मागणी

220

रावेर (शरीफ शेख) 

शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी ,केंद्र सरकारने लोकशाहीला पायदळी तुडवत जे तीन विधेयक आणत शेती व शेतकऱ्या वर जो अन्याय केला आहे व अन्याय कारक कामगार कायदे करून कामगाराची गळपेची करण्याचा प्रयत्न केला आहे.
ते चारही कायदे पैकी तीन कृषी विधेयकावर राष्ट्रपती महोदयांनी सही केली आहे.


सदर चारही पारित केलेले विधयेके त्वरित रद्द करण्यात यावी या साठी मंगळवारी जिल्हाअधिकारी मार्फत राष्टपती महोदयांना मुस्लिम मानियार बिरादरीचे अध्यक्ष फारूक शेख यांच्या नेतृवाखाली बिरदारीचे शेतकरी नशिराबाद येथील सैयद करीम,अब्दुल रउफ, पहुरचे सलीम शेख,शिरसोली चे इब्राहिम शेख,मुक्ताई नगर चे हकीम चौधरी,साकलीचे अस्लम शेख,चोपडा चे हकीम शेख,पाळधी चे अझीझ शेख,अमळनेर चे हुसेन जनाब,चाळीसगाव चे रफिक खान,पाचोरा चे जमील सौदागर,रावेर चे कादिर सर,फैजपूर चे सलिम शेख, यांच्या स्वाक्षरीने व उपस्थित निवेदन देण्यात आले . जिल्हा अधिकार्यालायत यांच्या हाती पोस्टर होते त्यावर लिहले होते.

शेतकरी ,बळीराजाचे वंशज उठ जागा हो
अन्यायी कायदे बदलण्याचा धागा हो
नही चलेगी नही चलेगी, दादागिरी नही चलेगी
सदर निवेदन जिल्हा अधिकारी मार्फत उप जिल्हा अधिकारी रवींद्र भारदे यांनी स्वीकारले व आपल्या भावना राष्ट्रपतींना कळवण्यात येईल असे आश्वासन दिले.