Home मराठवाडा अंबड तालुक्यातील महाकाळा येथील जवान कर्तृत्व बजावताना शहीद

अंबड तालुक्यातील महाकाळा येथील जवान कर्तृत्व बजावताना शहीद

1634

घनसावंगी- लक्ष्मण बिलोरे

जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील महाकाळा येथील जवान चंद्रकांत महादेव सुळे, राहणार भगवान नगर महाकाळा हे उत्तर कश्मिर मधील कुपवाडा जिल्ह्यात गुरूवारी कर्तव्यावर असताना शहीद झाला. अधिकारिक सुत्रांच्या वतीने सांगण्यात आले आहे की,कुपवाडा जिल्ह्यात मुख्य शहरालगत २५ किमी अंतरावर बारी बेहका जवळ ही घटना घडली या दुर्घटनेत अन्य सात सैनिक मारले गेले तर एक जण गंभीर जखमी झाला.

शहीद चंद्रकांत सुळे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.त्यांच्या पश्चात पत्नी उज्वला व इतर आहेत.

हे पण वाचा….!

शहीद चंद्रकांत सुळे यांचे आई-वडील शेतकरी कुटुंबातील आहेत.सात वर्षांपासून चंद्रकांत सुळे मातृभुमीच्या रक्षणार्थ कर्तृत्व बजावत होते, शहीद चंद्रकांत सुळे यांचे दोन वर्षांपूर्वी लग्न झाले होते.वृध्द आई-वडील आणि भाऊ महाकाळा येथे शेती करतात.पती चंद्रकांत सुळे शहीद झाल्याचा संदेश पत्नी उज्वला हिला तसेच त्यांच्या मामाला प्राप्त झाला.शहीद चंद्रकांत सुळे यांचा मृतदेह बुधवार ,३० सप्टेंबर दुपार पर्यंत कुटुंबास प्राप्त झाला नव्हता. अशी माहिती शहीद चंद्रकांत सुळे यांचे निकटवर्तीय संभाजी जाधव यांनी सांगितले.