
रावेर (शरीफ शेख)
जळगाव – शहरातील कोविंड रुग्णांची संख्या वाढत आहे सरकारी रुग्णालय त्यासाठी कमी पडत आहे काही खाजगी दवाखाने व डॉक्टर अत्यंत जास्त फी आकारीत आहे अशा या काळात सुद्धा जळगाव शहरातील काही डॉक्टर आपल्या या पेशाशी इमाने-इतबारे न्याय देत आहे अशा या डॉक्टरांचा खरे कोरणा युद्ध म्हणून जळगाव कोविड केअर युनिट हे त्यांना त्यांच्या दवाखान्यात किंवा घरी जाऊन ते करीत असलेल्या कार्याचं कौतुक करीत आहेत.
डॉ पराग चौधरी फुफ्फुस रोग तज्ञ
असेच जळगाव शहरातील डॉक्टर पराग चौधरी हे नाव जळगावकरांना नवीन नाही फुफ्फुस तज्ञ असे ते डॉक्टर असून कोविड जेव्हापासून सुरू झाला तेव्हापासून जळगाव शहरातील सर्वात प्रथम फुफ्फुस चे डॉक्टर म्हणून कार्यरत डॉक्टर पराग चौधरी यांनी आपल्या पेशाला साजेशे असे कार्य केले व करीत आहेत. कोविंड रुग्णांची तपासणी करून पाहणी करून ते त्यांना औषधोपचार लिहून देतात या रुग्णांची लक्षणे साधारण असतील तर त्याला घरीच उपचाराचा पर्याय उपलब्ध करून देतात जय रुग्ण थोडे जास्त प्रमाणात आजारी असतील त्यांना ते ऍडमिट करतात त्या रुग्णांना योग्य ते मार्गदर्शन करतात एवढेच नव्हे तर रात्री रुग्णाला आवश्यक असेल तेव्हा ते त्यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बोलतात व आवश्यक ते मार्गदर्शन करतात असे डॉ पराग चौधरी यांचा जळगाव कोविड केअर युनिट तर्फे स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र व शाल श्रीफळ देऊन युनिटचे अध्यक्ष गफ्फार मलिक यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला त्या वेळी फारूक शेख,अन्वर सिकलगर व अनिस शाह उपस्थित होते
डॉक्टर पंकज पाटील,बालरोगतज्ञ
सरकारी दवाखान्यात(डॉ उल्हास पाटील) दहा ते बारा दिवस पाच वर्षीय नोमान शेख ला ऍडमिट करून सेवा देण्यात आली व त्याला कोविड तर नाही म्हणून त्याच्याच सस्पेक्टड वार्डात पाठवून त्या बाळाची तपासणी करण्यात आली दोन दिवसात निगेटिव्ह अहवाल आल्यावर तो बाळ निगेटिव आढळून आला असला तरी दोन दिवस सस्पेक्टड वार्डात होता म्हणून त्या सरकारी दवाखान्याने व तेथील डॉक्टरानी त्यास पुनःश्च बाल विभागात नव्हे तर कुठेही ही ॲडमिट करण्यास नकार दिल्याने त्या बाळास पालकांनी जळगावच्या चिरायु हॉस्पिटल ला ॲडमिट केले.
दहा तासानंतर चिरायू च्या त्या हुशार डॉक्टरांनी त्या सरकारी रुग्णालय ला फोन करून विचारणा करण्यात आल्यावर तेथून त्यांना कळले की हा बाळ दोन दिवस सस्पेक्टेड वार्डात राहून आला आहे म्हणून चिरायू हॉस्पिटल वाल्यांनी त्या बाळास व पालकांना मध्यरात्री अक्षरशः बाहेर काढले.
अशावेळी या पाच वर्षीय बाळाला डॉक्टर पंकज नारायण पाटील यांनी देवदूत होऊन आपल्या दवाखान्यात ऍडमिट करू त्याच्यावर आवश्यक ते औषधोपचार केले व काल तो त्यांच्या दवाखान्यातून सुखरूप डिस्चार्ज झाला म्हणून अशा या खऱ्या कोरोणा युद्धाचे सुद्धा जळगाव कोविड केअर युनिट च्या अतिक शेख,फारूक शेख,अनिस शाह यांनी शाल ,श्रीफळ, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविले.या पूर्वी सुद्धा केला डॉक्टरांचा गौरव
जळगाव कोविड केअर युनिटने यापूर्वीही ही जळगाव शहरातील डॉक्टर सुयोग चौधरी,डॉ किरण पाटील, डॉक्टर मिलिंद चौधरी, डॉक्टर सुनील थत्ते, डॉक्टर परीक्षित बाविस्कर, डॉक्टर विजय गायकवाड, डॉक्टर पोटे, डॉक्टर प्रभा बडगुजर, डॉ राम रावलानी, व जळगाव शहरातील सर्व बीयूएमएस डॉक्टर यांचे सुद्धा कोरोना योद्धा म्हणून गौरव केलेला आहे.
काही डॉक्टर व हॉस्पिटल चे गौरव तर काहींच्या तक्रारी – फारूक शेख
जळगाव कोविड केअर युनिट हे खाजगी डॉक्टर ,सरकारी डॉक्टर, अथवा इतर जनरल प्रॅक्टिशनर जे खरोखरी रुग्णांची सेवा करीत आहेत त्यांचे मनोधैर्य वाढवण्यासाठी त्यांचा यथोचित गौरव करीत आहेत तसेच जे डॉक्टर किंवा हॉस्पिटल रुग्णांच्या जिवाशी खेळत आहेत निष्काळजीपणा करीत आहेत अशा डॉक्टर व हॉस्पिटलची ते प्रशासनाकडे तक्रार सुद्धा करीत आहेत त्यामुळे जळगाव कोविड केअर युनिट हे फक्त खाजगी डॉक्टरांची अथवा सरकारी रुग्णालयाची व डॉक्टरांची तक्रार करीत नसून जे चांगले कार्य करीत आहेत त्यांचा गौरव सुद्धा करीत आहे ही बाब जळगावकरांनी व खासकरून आय एम ओ च्या पदाधिकाऱ्यांनी लक्षात असू द्यावी असे आवाहन कोविड केअर युनिट प्रसिद्धीप्रमुख फारुक शेख यांनी एका पत्रकाद्वारे केले आहे.











































