Home महत्वाची बातमी क्या प्यार ऐसा भी होता है ????

क्या प्यार ऐसा भी होता है ????

424

 

सोशल मीडिया पर हूवे प्यार की खातीर वो चली गई नेपाल बॉर्डर ??

अमीन शाह ,

जळगाव
सोशल मीडिया फेसबुक वर एका 34 वर्षीय विवाहित महिलेची एका 22 वर्षीय तरुणासोबत मैत्री व ओळख निर्माण झाली . त्यातून दोघांचे सूत जुळले . यानंतर पळून जात विवाहिता थेट उत्तर प्रदेशातून नेपाळ बॉर्डरवर पोहोचली . त्या तरुणासोबत ‘ लिव इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचा निर्णय तिने घेतला . कुटुंबीयांसोबत पुन्हा घरी येण्यास नकार दिला . हताश झालेले कुटुंबीय व पोलिस मंगळवारी जळगावात परतले . जळगाव शहरात राहणारी ही ३४ वर्षीय महिला असून. तिला १४ वर्षांचा मुलगा आहे . गेल्या वर्षभरापूर्वी फेसबुकच्या माध्यमातून महिलेची मैत्री उत्तर प्रदेशातील एका २२ वर्षीय तरुणासोबत झाली . दोघांच्या गप्पा रंगू लागल्या मेसेज ची देवाण घेवाण झाली व त्यांचे सूत जुळले . एकमेकांसोबत राहून संसार करण्याचा निर्णय दोघांनी घेतला . यानंतर १५ ऑगस्ट २०१ ९ रोजी या महिलेने जळगाव सोडले . पत्नी अचानक घरातून निघून गेल्या मूळे घरातील सर्वांना चिंता झाली सर्वत्र शोध घेतल्या नंतर पतीने माझी पत्नी हरवली आहे अशी तक्रार जिल्हापेठ पोलिस ठाण्यात केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता त्या विवाहित महिलेचा मोबाइल दिल्ली येथे सुरू असल्याची तात्रिक माहिती पोलिसांनी दुसऱ्याच दिवशी मिळवली होती . यानंतर महिलेने मोबाइल बंद केला होता . दरम्यान , महिलेचे अपहरण झाले की काय ? या संशयातून जिल्हापेठ पोलिसानी हे प्रकरण
गांभीर्याने घेतले होते अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके , पोलिस उपअधीक्षक डॉ . निलाभ रोहन यांच्याकडे सर्व प्रकार सांगितला . तांत्रिक माहितीच्या आधारे जिल्हापेठ पोलिस ठाण्याचे पोलिस नाईक प्रविण भोसले व शेखर जोशी हे महिलेचे पती व मुलगा या दोघांसोबत १५ सप्टेंबर रोजी सुरुवातीला दिल्ली येथे गेले . महिलेच्या फेसबुक अकाउंट वरून पोलिसांनी काही तांत्रिक माहिती मिळवली , व त्या महिलेच्या संपर्कात असलेल्या तरुणांचे फोटो मिळवले नंतर पोलीस पथक दिल्लीहून मुरादाबाद , नैनिताल ला गेला फोटो च्या आधारे व स्थानिक नागरिक पोलिसांच्या मदतीने नैनितालपासून काही अंतरावर नेपाळ देशाच्या बॉर्डरजवळ एका छोट्या गावात महिला व तरुण मिळून आले पोलीस पथक पिता पुत्र यांनी सदर विवाहितेस घरी चालण्याची विनंती केली मात्र त्या युवकाच्या प्रेमात आंधळी झालेल्या त्या महिलेने पती , मुलासोबत पुन्हा जळगावात येण्यास नकार दिला . व मी याच तरुणां सोबत इथेच लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्याचा निर्णय घेतल्याचे तिने सांगितले . आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे सांगत त्यांना माघारी पाठवले . अखेर कुटुंबीय , पोलिस हताश होऊन मंगळवारी जळगावात पोहोचले .सध्या या प्रकरणाची चर्चा केली जात आहे ,

टीप , आमची बातमी कॉपी करा यात आम्हाला आनंद आहे , कॉपी होत नसल्यास आम्हाला फोन करा 🙏