Home विदर्भ प्रा. निलेश प्रकाशराव सुलभेवार यांना आचार्य पदवी बहाल

प्रा. निलेश प्रकाशराव सुलभेवार यांना आचार्य पदवी बहाल

184

यवतमाळ दिनांक 12/09/2020 – शिवशक्ती कला व वाणिज्य महाविद्यालय, बाभुळगाव येथिल इंग्रजी विषयाचे प्राध्यापक निलेश प्रकाशराव सुलभेवार यांना संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाची आचार्य पदवी नुकतीच बहाल करण्यात आली आहे. त्यांच्या संशोधनाचा विषय ‘नॉस्टाल्जिया इन दी सिलेक्ट नाॅव्हेल्स आॅफ व्ही. एस. नायपाॅल’ हा असुन आपले संशोधन कार्य त्यांनी डाॅ. वाय. पी. देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण केले. आपल्या यशाचे श्रेय ते शिवशक्ती शिक्षण संस्था कोठा (वेणी) चे व्यवस्थापक, माननीय प्राध्यापक बाळासाहेब धांदे, अध्यक्ष, दिनेशभाऊ भोरे, सचिव, सुशिलभाऊ भोरे, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी कला शाखा अधिष्ठाता, डाॅ. विवेक देशमुख, महाविद्यालयाचे प्राचार्य, डाॅ. दीपक कोटूरवार, डाॅ. सुधीर त्रिकांडे, प्राध्यापक गजानन माने, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हा अध्यक्ष अनिलभाऊ हमदापुरे, तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारीवर्ग, आपला मित्र परिवार, आईवडील व कुटुंबातील सर्व सदस्य यांना देतात.