
ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तथा ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा महाराष्ट्र राज्य
प्रा.मो.शोएबोद्दीन
अकोला – सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळणे बाबत व समाज कल्याण अंतर्गत असलेल्या विविध उपक्रम राबवण्या करिता मिळणे बाबत, तसेच
आपल्या महाराष्ट्रात गेल्या ४ ते ५ महीन्यापासुन कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे पुर्ण देशात लाँगडाऊन सुरू आहे. कोरोना या विषाणुने सर्वांच्याच नाकी नऊ आणले आहेत.
तसेच या कोरोनाच्या महामारी मुळे सर्व गोष्टिंवर ,सर्व वस्तुंनवर फार मोठा परिणाम पडला आहे या कोरोनाच्या लाँकडाऊन मध्ये जे युवा तरुण सुशिक्षित बेरोजगार आपल्या संसाराचा उदर्र निर्वाह करण्यासाठी कोरोना या महारीच्या आधि रोजगारासाठी पुणे, मुंबई, नागपुर,इतर शहरांमध्ये रोजगारासाठी गेलेले होते.
परंतु या कोविड-१९ मुळे सर्व तरुण वर्ग आज आपला रोजगार सोडून काहिच काम-धंदा नसल्यामुळे आपल्या आपल्या गावात येवुन व्यसनाधिन होतांना दिसत आहेत.
तरी आमच्या काहि आपणांस मागण्या आहेत त्या पुर्ण करण्यात यावे.
आमच्या मागण्या खालिल प्रमाणे:-
१) सुशिक्षित बेरोजगारांना गाव पातळीवर किंवा जिल्हा पातळीवर रोजगार देणे.
२) शासनाचे जे काहि उपक्रम,काहि प्रोजेक्ट असतील तर ते आम्हाला देण्यात यावे.
३) पातुर तालुक्यातील सस्ती या गावी असलेली भारतीय स्टेट बँक मध्ये सतत कनेक्टिव्हिटी नसल्या कारणामुळे मुळे लोकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यावर काही तरी लवकरात लवकर तोडगा काढण्यात यावा.
५) खेडोपाडी कोरूना चा शिरकाव दिसून येत असल्याने ग्रामीण भागातील ग्रामीण रुग्णालयांमध्ये औषधींचा तुटवडा भासत असल्या कारणामुळे यावर गांभिर्याने लक्ष देऊन तो पूर्ण करण्यात यावा.
इत्यादी मागण्या ग्रामीण युवा बहुउद्देशिय संस्था तथा ग्रामीण युवा संघटना अकोला जिल्हा च्या वतीने दिनांक ८ सप्टेंबर २०२० रोजी समाज कल्याण सभापती साहेब, अडिशनल कलेक्टर साहेब मार्फत जिल्हाधिकारी साहेब,व मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब अकोला यांना निवेदन देऊन इत्यादि मांगण्या करण्यात आल्या उपस्थित मान्यवर मा.सतिश देवराव हातोले (संस्थापक/अध्यक्ष),मा.नरेंद्र नवनित इंगळे (जिल्हा महासचिव),मा.सतीशकुमार भारत हातोले (जिल्हा संघटक), मा. मुकेश संतोष हातोले (प्रसिद्धी प्रमुख), मा.मेजर मंगेश भाऊ तायडे,(सामाजिक कार्यकर्ते), मा.रुपेशभाऊ जंजाळ, मा.सुमितभाऊ अंभोरे,मा.अमोलमामा खंडारे (ता.कार्याध्यक्ष),मा.शुभमभाऊ हिवराळे,(सामाजिक कार्यकर्ते),शेख जावेदभाई (शहराध्यक्ष),शेख शाहरुखभाई (शहरसचिव) मा.नितीनभाऊ ठाकरे (बाळापुर ता.अध्यक्ष),मा.अकिंतभाऊ सरदार, मा.राष्ट्पाल भाऊ भोजने(ता.कोषाध्यक्ष), सावनभाऊ गवई (ता.संघटक पातुर) मा.आकाशभाऊ धवसे, मा.राकिंग निलभाऊ,मा.आबिद भाई खान(महानगर महासचिव), आवेशभाई, शेख शाकिरभाई, पवनभाऊ तांबे.कपिलभाऊ वानखडे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.










































