Home विदर्भ गणगाव च्या ११महीलांचे गॅस कनेक्शन परस्पर विकले  

गणगाव च्या ११महीलांचे गॅस कनेक्शन परस्पर विकले  

234
0

धारकार्डचा दुरुपयोग , महीलांच्या खोट्या सह्या तो ” दलाल “कोण? सोपान वर संशय 

देवानंद जाधव

यवतमाळ – आर्णी तालुक्यातील गणगाव च्या अत्यंत गरीब परिवारातील अकरा महीलांचे गॅस कनेक्शन दलालांनी परस्पर विकल्याची बाब ऊघडकीस आली आहे.
प्रधानमंञी ऊज्ज्वला योजने अंतर्गत महीलांना गॅस कनेक्शन मंजुर झाले. माञ एजंसीच्या कर्मचार्याला गणगावच्या लंगडा नामक दलालाने हाताशी धरुन सर्व कनेक्शन विकले आहे. या प्रकरणात सोपान नामक एजंसी कर्मचारी महीलांना आजही टोलवाटोलवीचे ऊत्तर देत आहे. दलालांनी महीलांच्या आधार कार्ड चा दुरुपयोग करुन, कागदपञावर खोट्या सह्या मारुन गॅस विकण्याचा प्रताप केला आहे.सही पुरत्या साक्षर असणार्या गरीब असहाय्य महीलां जवळुन गॅस कनेक्शन च्या नावावर प्रत्येकी हजार रुपये लंगडा आणि सोपान या खिशेकापुंनी लुटले आहे. काही महीलांच्या बॅंक खात्यावर अनुदान जमा होत आहे. माञ या दलालांनी परस्पर गॅस विकल्याने अनेक गरीब महीला चुलीच्या धुरांड्यामध्ये काळवंडून गेल्या आहेत. गॅस चे पुस्तक सुध्दा या दलालांनी या महीलांना दिले नाही. गॅस कनेक्शन ची मागणी केल्यास महीलांना दमदाटी केल्या जाते. एकंदरीत गॅस एजंसी मध्ये आंधळं दळतंय अन् कुञ पिठ खातंय. ही अवस्था झाली आहे.हातावर आनुन पानावर खाणार्या गणगाव च्या गरीब महीलांना गॅस कनेक्शन कधी मिळेल, असी आस लागली आहे. मोल मजुरी सोडून गॅस साठी मागिल अनेक महीन्यापासुन या महीला विविध एजंसी चे ऊंबरठे झिजवत आहे. माञ अद्यापही त्यांच्या पदरी निराशाच आली आहे.
सुरेखा भगवान बावणे आधारकार्ड क्र.४१ ६४ ८७ १६ १६ ०८,,
सुनिता गुणवंत गोते
३९ ५६ ८९ ४६ २८ ८३ ,,
रेखा संतोष खोडके
६६ ०० ७३ ६२ ४९ ०४
या महीलांसह अनेक महीलांनी गॅस ऊचलल्याची एजंसी मध्ये नोंद आहे. माञ ते कनेक्शन गेले कुठे?
हा संशोधनाचा विषय आहे. गणगावचा देशी दारू विक्रेता लंगडा दलाल आणि एजंसी कर्मचारी सोपान सह अन्य टोळक्यांनी या महीलांचेगॅस कनेक्शन परस्पर विकले आहे.
यवतमाळ चे कर्तव्यदक्ष जिल्हाधीकारी एम.डी सिंह यांनी या गरीब महीलासोबत दलालांनी केलेल्या फसवणुकीची गंभीरपणे दखल घेऊन, दोषीवर फौजदारी कारवाई करावी आणि गोर गरीब महीलांना गॅस कनेक्शन ऊपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली जात आहे.