
जालना – जिल्हातील परतुर तालुक्यातील आष्टी पोलीस स्टेशन येथे पोलीस कर्मचारी व डॉक्टर सर्व कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबापासून कोसो दूर राहून आपला जीव पणाला लावून २४सर्व, आरोग्याची,कुंटुबियाची पर्वा नकरता अहोरात्र सेवा देणारे सर्व पोलिस अधिकारी-कर्मचारी व डॉक्टर या सर्वांना पोलीस मित्र परिवार समन्वय समितीचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ.संघपाल उमरे यांच्या मार्गदर्शनखाली आष्टी पोलीस स्टेशनचे सहा.पोलीस निरिक्षक श्री. एस.बी. सानप, सहा.पोलीस उपनिरिक्षक श्री. आर.बी.पठाडे, पुलिस हेड कांस्टेबल एस.बी.चव्हाण,आर.आर.गौड,आर.एल.कांदे,एस.एस.काकडे,पो.हेड कांस्टेबल व आष्टी पोलीस विभागातील सर्व कर्मचारी,व डॉ.शिवाजी मोगरे,डॉ.पाईकराव ज्ञानेश्वर शेळके यांना पो. मि.प.स. समिती परतुर तालुका अध्यक्ष राम राठोड,उपाध्यक्ष पोपट मोरे,परतुर तालुका समितीचे पदधीकारी यांचे वतिने कोरोना योद्धा सन्मान पत्र देऊन गौरविण्यात आले.आष्टी पोलीस स्टेशनचे एस.बी.सानप,सहा.पो.निरिक्षक यांनी या उपक्रमा बाबत समिती आभार व धन्यवाद व्यक्त केले.व समिती महाराष्ट्र राज्य मध्ये पोलीस विभागाची दखल घेत आहे याबात समाधान व्यक्त केले व पुढेही पो.मि.स.समितीने सहकार्य मदत करावी असे याप्रसंगी मनोगत व्यक्त केले.











































