Home जळगाव मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे वृक्षा रोपण….

मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे वृक्षा रोपण….

61
0

वसुंधरेचा समतोल राखण्यासाठी वृक्षा रोपण गरजेचे-फिरोज शेख

रावेर (शरीफ शेख)

जळगांव – येथील मौलाना आझाद अल्पसंख्याक फाऊंडेशन तर्फे फातिमा नगर भागात वृक्षा रोपण करण्यात आले.गेल्या काही महिन्यांपासून वृक्ष संवर्धन अभावी पर्यावरणाचा समतोल ढासळताना दिसत आहे ऋतूत होणारा बदल, वृक्ष तोड,जास्त कमी प्रमाणात पाऊस, वृक्ष लागवडचे प्रमाण कमी होत असल्याने पर्यावरणाचा समतोल ढासळताना दिसत आहे.पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरण प्रेमी, समाजसेवक, संस्था यांनी वृक्षा रोपण करावे असे आवाहन मौलाना आझाद फाऊंडेशनचे अध्यक्ष फिरोज शेख यांनी केले.फातिमा नगर भागातील विविध ठिकाणी वृक्षा रोपण करण्यात आले.कडूनिंब,चिंच, जांभूळ,पेरू, अशोका,सिताफळ,रेन ट्री, पारिजात,सिसम, अश्या डेरेदार वृक्षांची लागवड करण्यात आली.नागरिकांना वृक्षा रोपण बाबत माहिती देण्यात आली तसेच पर्यावरण बाबत आजच्या परिस्तिथीची जाणीव व मानवीय जीवनात झाडांचे महत्त्व निसर्ग पर्यावरण मंडळचे जिल्हा सहसचिव विजय लुल्हे यांनी नागरिकांना सांगितले. वृक्ष संवर्धनासाठी परिसरात नागरिकांनी जबाबदारी स्वीकारली आहे.
कृती फाऊंडेशनचे अमित माळी व प्रवीण पाटील फाऊंडेशनचे प्रवीण पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमाला तरसोद जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक विजय लुल्हे यांनी वृक्ष देऊन अनमोल सहकार्य केले. परिसरातील जेष्ठ नागरिकांनच्या हस्ते वृक्षा रोपण करण्यात आले. जनमत प्रतिष्ठानचे अध्यक्ष पंकज नाले यांच्या पिताश्री स्व.किसन पुना नाले यांच्या कार्यकर्तृत्वाची विजय लुल्हे यांनी संक्षेपानं माहिती दिली. त्यानंतर स्व. किसन नाले यांना उपस्थितांनी मौन पाळून भावपूर्ण श्रद्धांजली अपर्ण करण्यात आली.
या वेळी मौलाना आझाद फाऊंडेशनचे फिरोज शेख, तरसोद जिल्हा परिषद शाळेचे विजय लुल्हे, डॉ.आमिर सालार,सैय्यद झिशान,स्वप्नसाकार फाऊंडेशनच्या भारती काळे, स्वामी समर्थ संस्थेच्या प्रतीक्षा पाटील,नोबेल इंटरनॅशनल स्कूलच्या अर्चना सुर्यवंशी, कमलकेशव प्रतिष्ठानच्या भारती म्हस्के, जिनल जैन,विशाल शर्मा, आदींचे सहकार्य लाभले.सलीम भाई, मुश्ताक भाई, गुड्डू सालार मोहन आदींनी परिश्रम घेतले.