Home विदर्भ प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान महिला जिल्हाध्यक्षपदी अश्‍विता वाढवे यांची नियुक्ती

प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियान महिला जिल्हाध्यक्षपदी अश्‍विता वाढवे यांची नियुक्ती

72
0

यवतमाळ – जय विजय चौक येथे प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानच्या महिला कार्यकर्त्यांची बैठक विदर्भ अध्यक्ष अतुल शेळके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. त्यामध्ये इनरव्हिल कल्ब ऑफ यवतमाळ ज्वेल्सच्या प्रसिद्धी प्रमुख व सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता सौ. अश्‍विता प्रविण वाढवे यांची प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रचार अभियान महिला यवतमाळ जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.

या प्रसंगी जिल्हा कार्यकारणी घोषित करण्यात आली त्या मध्ये उपाध्यक्ष पदी सौ. छाया रंगारी, सौ. विजया मुळे, सौ. सोनाली घसाड, सौ. नीता ठाकरे, सचिव पदी ज्योती मेश्राम, रितू गायकवाड, संध्या खीरस्कर, माधुरी मोडक, सहसचिव पदी अंजली वाघमारे, दिपाली मनवर, अश्‍विनी खुळे, प्रिया गोविंदानी आदिंची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. या प्रसंगी मार्गदर्शन करतांना विदर्भ अध्यक्ष अतुल शेळके यांनी उपस्थित महिला कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना, सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे उद्देशाने महिला कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे प्रयत्न करावे असे आवाहन करुन नवनियुक्त पदाधिकार्‍यांचे अभिनंदन केले. या प्रसंगी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता इंजि. प्रज्ञा नरवडे प्रामुख्याने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे संचलन ज्योती मेश्राम यांनी तर आभार प्रदर्शन संध्या खिरस्कर यांनी केले. प्रारंभी प्रधानमंत्री जनकल्याणकारी योजना प्रचार प्रसार अभियानाचे विदर्भ अध्यक्ष अतुल शेळके यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.