
पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष
महाराष्ट्रात कोरोना काळात आरोग्य आणि पोलिस कर्मचाऱ्यांना 50 लाखाच्या विमाकवच योजनेची घोषणा करण्यात आली होती. अनेक ठिकाणी पत्रकारांना कोरोनाची लागण झाली. या पार्श्वभुमीवर आरोग्य, पोलिस कर्मचाऱ्याबरोबर पत्रकारही आपला जीव धोक्यात घालून कोरोना काळात काम करत असल्यामुळे पत्रकारांनाही विमा कवच द्यावे अशी मागणी पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष विनोद पञे यांनी सरकारकडे , करुन वेगवेगळ्या माध्यमातून पाठपुरावा केला.
दरम्यान महाराष्ट्रात,अनेक ठिकाणी यापूर्वी सुध्दा पञकारांचा कोरोना मुळे मुत्यु झाला आहे व आता पुण्यात पांडुरंग रायकर या पत्रकारांचा कोराेनामुळे मृत्यू झाला.
याबाबत पञकार संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष यांनी सरकारला घोषणेची आठवण करुन देत दिवंगत पत्रकारांच्या कुटूंबियांना 50 लाखांची मदत करावी अशी मागणी केली आहे .










































