Home नांदेड नवोपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्ता शिक्षणाची कास धरणाऱ्या शिक्षकांचं कार्य सदैव प्रेरणादायी – गट...

नवोपक्रमाच्या माध्यमातून गुणवत्ता शिक्षणाची कास धरणाऱ्या शिक्षकांचं कार्य सदैव प्रेरणादायी – गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने

138

मजहर शेख, नांदेड

नांदेड / किनवट , दि. ०७ :-  आपणास अवगत असलेलं ज्ञान चिमुकल्या लेकरांपर्यत पोहचविण्यासाठी सतत विविध नवोपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षणाची कास धरणाऱ्या शिक्षकांचं कार्य इतरांनाही सदैव प्रेरणादायी आहे, असे गौरोद्गार गट शिक्षणाधिकारी अनिलकुमार महामुने यांनी काढले .

शिक्षक दिनाचं औचित्य साधून थेट शाळेत जाऊन धडपडणाऱ्या शिक्षकांचा त्यांनी सन्मान केला, या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी प्र.शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी खुडे, केंद्रप्रमुख विजय मडावी, केंद्रिय मुख्याध्यापक शरद कुरुंदकर उपस्थित होते.
कोविड -19 काळात अॉनलाईन/अॉफलाईन विविध मार्गांचा अवलंब करून अध्यापनाचे उत्कृष्ट कार्य करून ‘शाळा बंद परंतु शिक्षण सुरु ‘ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या सतत संपर्कात राहून अध्ययनरत असणाऱ्या शिक्षकांचा त्यांनी गौरव केला . ‘भिंत तेथे फळा’ व ‘आपले अंगण,आपली शाळा’ तसेच अॉनलाईन अध्यापन पद्धतीचा वापर विद्यार्थ्यांच्या गृहभेटीचा विशेष उपक्रम राबविणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रोहिदास तांडा येथील शिक्षिका शालिनी सेलूकर व मुख्याध्यापक प्रशांत शेरे यांचा, टाळेबंदीतही नियमितपणे शाळेत जाऊन विविध उपक्रम राबवून, सतत संपर्क ठेऊन विद्यार्थ्यांना अध्ययनशील ठेवणाऱ्या जि.प.प्रा.शाळा गणेशपूर (जुने) येथील शिक्षिका उर्मिला परभणकर व मुख्याध्यापक प्रवीण पिल्लेवार यांचा आणि कनकवाडी या उपक्रमशील शाळेतील उल्लेखनीय कार्याबद्दल शिक्षक प्रदीप पवार व मुख्याध्यापक दीपक राणे यांचा त्यांनी सत्कार केला. तसेच सर्व शिक्षकवृंदाचे अभिनंदन केले .