Home विदर्भ अन तिचा नवरा पाहताच सगळेच गेले चक्रावून , ???

अन तिचा नवरा पाहताच सगळेच गेले चक्रावून , ???

631

 

 

अमीन शाह ,

आजच्या या बदलत्या काळात काय होईल काय घडल हे सांगता येणे कठीण झाले आहे , पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलं मुली वर अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असते आजच्या या ऑनलाईन मोबाईल मूळे वयात येणाऱ्या मुलं मुलीत विपरीत परिणाम होत आहे
वयाची अठरा वर्षे पूर्ण होताच एका सुशिक्षित कुटुंबातील एक मुलगी घरातून गायब झाली त्याचवेळी तिच्या संपर्कातील आणखी एक मुलगी देखील गायब झाली. आईवडिलांनी इकडे तिकडे शोध घेतला मात्र त्यास यश आले नाही त्यामुळे अखेर वैतागून त्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली आणि पोलिस यंत्रणा कामाला लागली.
पोलिसांनी त्यांचे मोबाईल लोकेशन,फेसबुक अकाउंटचे लोकेशन ट्रेस करून हुडकून काढले यात पळून गेलेल्या दोघीजणी एकाच ठिकाणी असल्याचे आढळून आले. त्यांना पोलिसांनी पकडून पोलीस ठाण्यात हजर केले असता त्यांनी दोघीनीं ही लग्न केल्याचे सांगितले . ‘ तुझा नवरा कुठे आहे ‘ असे पोलिसांनी विचारताच त्यातील एकीने दुसरीकडे बोट दाखवले. पोलीस देखील ह्या प्रकाराने चक्रावून गेले. ही धक्कादायक अजब गजब घटना नागपूर जिल्ह्यात उघडकीस आली आहे.
मिळालेल्या माहिती नुसार , यातील सीमा (काल्पनिक नाव ) ही लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते तर दुसरी संगीता (काल्पनिक नाव ) ही पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहते . एका लग्नात या दोघींची ओळख झाली.नजरेला नजर भिडली दोघी एकाच वयाच्या त्यांनी एकमेकांचे नंबर शेअर केले आणि त्यानंतर सातत्याने त्या दोघी तासन तास एकमेकांशी बोलत रहायच्या. गप्पा मारायच्या यात दोघींचा पक्का दोस्ताना झाला मुलीशीच बोलतेय अशा विश्वासावर घरचे देखील गाफील राहिले.कधी या दोघीत प्रेम झाला हे घरच्यांना कळलेच नाही त्यांची ओळख झाली त्यावेळी त्यांचे वय १८ पेक्षा कमी होते मात्र १८ पूर्ण झाले की घरातून पळून जायचे आणि लग्न करायचे यावर त्यांचे एकमत झाले होते.

वयाची १८ वर्षे पूर्ण होताच दोघीही घरातून पसार झाल्या. तरुण मुली घरातून गायब झाल्याने आईवडील देखील घाबरून गेले आणि पोलिसात तक्रार नोंदवली. पोलीस तपासात मोबाईलच्या आधारावर त्या दोघीही कामठी मार्गावर सोबतच असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात हजर केले आणि त्यांच्या आई वडिलांना बोलावून घेतले. आईवडील आल्यानंतर त्यांनी ‘ आम्ही लग्न केलय ‘ असे सांगताच घरचे हादरून गेले पण ‘ ठीक आहे लग्न केले तर तुझा नवरा कुठाय ? ‘ असा प्रश्न विचारताच त्यातील एकीने दुसरीकडे बोट दाखवले.

समलैंगिक संबधाचा हा पराक्रम पाहून घरचे काय पण पोलीस देखील चक्रावून गेले. ‘आम्ही सज्ञान झालेलो असून आम्ही एकमेकींना नवरा बायको म्हणून स्वीकारले आहे ‘ असे त्यांचे म्हणणे आहे . त्याचे म्हणणे ऐकून दोघींच्याही घरच्यांनी कपाळाला हाथ लावला असून पोलिसांनी समुपदेशन करून दोन्ही मुलीना त्यांच्या आईवडिलांच्या ताब्यात दिले आहे.

चिंतेची बाब ,

विदेशात घडणारी घटना आपल्या विदर्भात घडली ही एक चिंतेची बाब असून पालकांनी आपल्या वयात येणाऱ्या मुलं मुली वर अधिक लक्ष देण्याची गरज आहे

 

(बातमी सोबत असलेला फोटो काल्पनिक चित्र आहे , )