
हनिफ शेख ,
अंढेरा(प्रतिनिधी) तुडुंब भरलेल्या विहिरीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या एका २२ वर्षीय युवकांचा पाण्यात बुडवून करुण अंत झाल्याची घटना चिखली तालुक्यातील अंत्रीखेडेकर येथे आज दिनांक २७ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजे दरम्यान घडली.
गजानन मधुकर पवार वय २२ वर्ष असे मृतक युवकाचे नाव असून तो यावर्षी उन्हाळ्याच्या सुट्टीत नुकताच पोहणं शिकला होता यंदा पावसाळा मुबलक झालेला असल्याने विहिरी तुडूंब भरलेल्या आहे गावातीलच शिवाजी खेडेकर यांच्या तुडूंब भरलेल्या विहिरीत त्याने पोहोण्यासाठी उडी मारली मात्र तो बुडू लागला हे सोबत गेलेल्या दोन लहान मुलांनी पाहिले व आरडाओरडा करून त्यांनी बाजूच्या शेतात काम करणाऱ्या लोकांना बोलवले मात्र तो पर्यत गजानन बुडालेला होता
यापूर्वी त्याचे वडीलाचा सुद्धा मृत्यू झालेला असून एकुलत्या एका मुलाचा मृत्यू झाल्याने सदर महिलेवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दोन बहिणीचे लग्न झालेले असून या घटने मुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे
अंढेरा पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून पुढील तपास पीएसआय मोहन पाटील हे करीत आहे.











































