Home महत्वाची बातमी प्रहार जनशक्तीच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदि कर्तव्यदक्ष संतोषभाऊ शिंगणे यांची निवड

प्रहार जनशक्तीच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदि कर्तव्यदक्ष संतोषभाऊ शिंगणे यांची निवड

283

रवी जाधव ,

देऊळगाव राजा:- गेल्या काही महिन्यांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून करत असलेले सामाजिक कार्य आणि पक्षाप्रति असलेली निष्ठा पाहून प्रहार जनशक्ती पक्षाच्या बुलढाणा जिल्हा उपाध्यक्ष पदि देऊळगाव मही येथील कर्तव्यदक्ष संतोषभाऊ शिंगणे यांची निवड करण्यात आली.
गेल्या अनेक दिवसांपासून प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून संतोषभाऊ शिंगणे यांनी अनेक आंदोलनाच्या माध्यमातून केलेले सामाजिक कार्य पाहता पक्षाचे संस्थापक अध्यक्ष राज्यमंत्री मा.बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशानुसार ही निवड करण्यात आली.
संतोषभाऊ शिंगणे यांच्या निवडीमुळे समाजातील बहुदुर्लक्षीत,वंचित, अनाथ,दिव्यांग,शेतकरी, शेतमजूर,रुग्ण,तसेच गरजू लोकांना त्यांच्या आंदोलनाच्या माध्यमातून न्याय मिळणार एव्हडे मात्र नख्खी.