Home जळगाव कळमसरे येथील तरुण शेतकऱ्याचा अकस्मित मृत्यु

कळमसरे येथील तरुण शेतकऱ्याचा अकस्मित मृत्यु

292

अमळनेर-प्रतिनिधी

येथील प्रकाश उर्फ (सुनील) चुनिलाल वैराळेे (माळी) वय- 32 आज ता.19 रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास शेतात काम करताना अचानक फिट( मिरगी) आल्याने तो जागीच बेशुद्ध पडला.त्याला तात्काळ अमळनेर येथील डॉ. अनिल शिंदे यांच्याकडे घेऊन गेले असता डॉक्टरानी त्याला मृत घोषित केले.
प्रकाश हा चुनिलाल वैराळे (माळी) यांचा एकलता एक मुलगा होता.त्याचे मागील दीड वर्षापूर्वी विवाह झाला होता.त्यांच्या या घटनेने गावात सर्वत्र स्मशान शांतता पसरली होती.त्याची पत्नी ,आई,वडील यांचा आक्रोश मनाला हेलावणारा होता.गावात मितभाषी आणि कस्टाळु होता.
त्याचे काका रतिलाल दौलत माळी यांच्या सांगन्यावरुन मारवड पोलीस ठाण्यात त्याची आकस्मिक मृत्युची नोंद करण्यात आली आहे.
अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात डॉ. जी.एम.पाटील यांनी शवविच्छेदन करण्यात आले.रात्री उशिरा त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.