Home विदर्भ कामगार संघटना संयुक्त कृती समिती वर्धा ८ जानेवारी २०२०रोजी देशव्यापी संप .!

कामगार संघटना संयुक्त कृती समिती वर्धा ८ जानेवारी २०२०रोजी देशव्यापी संप .!

111

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

जिल्हाधिकारी कार्यालयावर
कामगार कर्मचाऱ्यांचा विशाल मोर्चा.

वर्धा , दि. ०८ :- देशातील प्रमुख ११ कामगार संघटना व राज्य सरकारी निम सरकारी आरोग्य कर्मचारी फेडरेशन च्या आवाहनानुसार ८ जानेवारी रोजी जिल्ह्यातील कामगार कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर विशाल मोर्चा आयटक राज्य उपाध्यक्ष काँमरेड दिलीप उटाणे कृती समिती अध्यक्ष गुणवंत डकरे प्रदिप दाते सिटूचे काँ यशवंत झाडे राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्तीचे हरिचंद्र लोखंडे विनोद बालतडक आरोग्य कर्मचारी संघटनेचे सिध्दार्थ तेलतुंबडे दिपक कांबळे नलिनी उबदेकर वंदना उईके सुजाता कांबळे प्राथमिक शिक्षक समितीचे विजय कोंबे नरेन्द गाडेकर एमएसईबी वर्कर्स फेडरेशनचे सुरेश गोसावी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सायंकार अंगणवाडी युनियचे विजया पावडे मैना उईके शबाना खान ज्ञानेश्वरी डंभारे असलम पठाण माला भगत प्रज्ञा ढाले अरुणा नागोसे आशा गटप्रवर्तक संघटनेचे सुजाता भगत शबाना शेख ज्योषना राउत प्रतिभा वाघमारे विना पाटीलसिःधू खडसे शापोआचे जयमाला बेलगे विनायक नन्नोरे नलू टिपले कंञाटी नर्सेस संगिता रेवडे यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला .यावेळी विविध बारा मागण्याचे निवेदन उप जिल्हाअधिकारी अशोक लटारे यांना देण्यात आले.
यावेळी रमेश बोदरकर मारोतराव इमडवार शोभा सायंकार सिमा गढिया बदना बाचले अरुणा खैरकार वैशाली नंदरे यांचे सह अनेक आयटक सदस्य उपस्थित होते.