Home जळगाव भरवस रिमझीम पावसाच्या झळी मुळे मातीचे घर कोसळून ४० वर्षीय महिलेचा गेला...

भरवस रिमझीम पावसाच्या झळी मुळे मातीचे घर कोसळून ४० वर्षीय महिलेचा गेला जीव इतर ३ जण झाले जखमी

191

रजनीकांत पाटील

अमळनेर –  तालुक्यात तीन ते चार दिवसांपासून पावसाची संतत धार सुरू आहे. यामुळे तालुक्यातील भरवस येथील जुने मातीचे घर कोसळून ४० वर्षीय महिला जागीच ठार झाली तर घरातील इतर तीन सदस्यही जखमी झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, भरवस येथील सुशिलाबाई लोटन अवचिते ह्या ४० वर्षीय महिला सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास स्वयंपाक खोलीत स्वयंपाक करण्यासाठी गेली असताना पावसाच्या संतत धार सुरू असल्याने अचानक पूर्ण घर कोसळले. त्यात सदर महिला दाबली गेल्याने तिचा जागीच मृत्यू झाला तर घरातील इतर तीन सदस्य जखमी झाल्याची दुर्घटना घडली. घर कोसळल्याचे लक्षात येताच नातेवाईकांसह गावकऱ्यांनी धाव घेतली. मातीच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या महिलेस काढण्यासाठी बराच वेळ शर्तीचे प्रयत्न केले गेले. परंतु तरीही महिलेचा जीव वाचू शकला नाही. घर कोसळल्याने स्वयंपाक घरातील फ्रीजसह अंदाजे 70 हजार रुपये किमतीच्या संसारोपयोगी वस्तूंचेही नुकसान झाले आहे. याप्रकरणी मारवड पोलिसात नोंद करण्यात आली असून पुढील तपास भास्कर चव्हाण हे करीत आहेत.