Home महाराष्ट्र -कळंबच्या महाराजांचा कोविड केयर सेंटर मधून पळ*

-कळंबच्या महाराजांचा कोविड केयर सेंटर मधून पळ*

231

 

-सलमान मुल्ला*

याबाबत सविस्तर माहिती अशी की कळंब शहरातील एका महाराजांचा अहवाल 4 दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्यांना उस्मानाबादमधील कोरोना सेंटरला ठेवण्यात आले होते.

पण ‘मला लोकांमध्ये मिळून मिसळून राहण्याची सवय आहे. या कोविड केयर सेंटरमध्ये जेवण व्यवस्थित नाही. कोणाला भेटू देत नाहीत. मला या ठिकाणी राहायचे नसून मला गावी मठात परत जाऊ द्या म्हणून ते महाराज चक्क उस्मानाबाद शहरातील नगरपालिका समोर येऊन बसले

मला कोविड केयर सेंटरमध्ये करमत नाही. जेवण चांगले मिळत नाही,’ असा आरोप करत कोरोना बाधित असलेले महाराज यांनी केला आहे..

मात्र महाराजांच्या या कृत्यामुळे परिसरातील लोकांची व रुग्णालयातील कर्मचारी यांची चांगलीच भांबेरी उडाली. या महाराजांना परत कोविड केयर सेंटर मध्ये आणण्यासाठी आरोग्य यंत्रणा कर्मचारी पीपीई किट घालून रुग्णवाहिका घेऊन रस्त्यावर. मात्र तरीही महाराज परत जाण्यास तयार नसल्याने त्यांची चांगलीच गोची झाली होती..

Previous article
Next articleवृक्षारोपण करुन स्वतंत्रदिन साजरा
editor
भारत सरकारने फेब्रुवारी 2021 पासून अधिसूचित केलेल्या नव्या माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक सूचना आणि डिजिटल माध्यमांसाठीची आचार संहिता) नियम 2021 अंतर्गत असलेल्या डिजिटल माध्यमांसाठीच्या आचार संहितेचे आम्ही पालन करतो. तरीही एखाद्या बातमीविषयी आपली तक्रार असल्यास आमच्या वेब माध्यमचे तक्रार निवारण अधिकारी आणि स्वनियमन संस्थेकडे विहित नमुन्यात अर्ज करू शकता. आपल्या तक्रारीचे निराकरण केले जाईल.