Home विदर्भ वृक्षारोपण करुन स्वतंत्रदिन साजरा

वृक्षारोपण करुन स्वतंत्रदिन साजरा

126
0

वर्धा / येरला :- जि.प.प्राथमीक शाळा , ग्रामपंचायत कार्यालय,स्व.भाऊराव पाटील येरलेकर विद्यालय,राणी दुर्गावती सूतगिरणी कार्यालय येथे स्वतंत्र दिनाच्या औचित्याने वृक्षारोपण व झेंडावंदन करण्यात आले.
गावातील जेष्ट नागरिक बाळकृष्ण चाफले यांच्या हस्ते वृक्ष लागवड करुन सुरुवात करण्यात आली.यावेळी स्व. भाऊराव पाटील विद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक , जि. प. शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक सरपंच अस्मिता पंधरे,उपसरपंच मेघेश्याम झिले, सचिव एन.एन.पाटील, तलाठी श्री. बिमरुट,तंटामुक्ती अध्यक्ष गुलाबराव पंधरे,शिक्षण समिती अध्यक्ष,उपाध्यक्ष व गावातील प्रतीष्टीत नागरिक उपस्थीत होते.
यशस्वीतेकरिता अनिल तागडे (सामाजिक कार्यकर्ता), पत्रकार प्रमोद झिले, अमीर वावरे,किशोर झिले,लोमेश साखरकर,मयुर तन्निरवार, प्रकाश पंधरे, बाळकृष्ण चाफले, निलेश बेंदले यांचे सहकार्य लाभले

Unlimited Reseller Hosting