Home जळगाव एम पी जे रावेर युनिट तर्फे रेशन संदर्भात तहसीलदारांना निवेदन

एम पी जे रावेर युनिट तर्फे रेशन संदर्भात तहसीलदारांना निवेदन

363

संबंधित अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी….

रावेर (शरीफ शेख )

येथील एम पी जे तर्फ तहसीलदार उषाराणी देवगुणे यांना धान्य बाबत निवेदन देण्यात आले .निवेदनात म्हटले आहे की
रावेर येथिल एमपीजे (मुव्हमेंट फॉर पीस अॅन्ड जस्टिस फाॅर वेलफेअर) चे कार्यकर्ते यांनी रावेर तहसीलदार यांना शिधापत्रिका धारकांबाबत गेल्या वर्षी १५/ २ /२०१९ रोजी माहिती निवेदनाच्या स्वरूपात दिली होती. व त्यासोबत शिधापत्रिका क्रमांक, संदर्भ क्रमांक आणि दुकान नंबर सुध्दा नमुद केलेला होता.
एकून ४२६ फार्म आम्ही आपल्या पुरवठा शाखेत दिलेल्या होते.सद्य स्थिती मध्ये काहीही सुधार व कोणत्याही प्रकार ची अजून पर्यंत अंबलबजावनी करण्यात आलेली नाही.
लोकांना अजून ही शिधा (रेशन) मिळत नसल्यामुळे आम्ही आपणास विनंती करतो की त्या बद्दल आम्हाला माहीती द्यावी तसेच शिधापत्रिकाधारकांबाबत तक्रार असल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात यावी . अशी मागणी तहसीलदारांना दिलेलया निवेदन करण्यात आली आहे. निवेदनावर एम पी जे तालूकाध्यक्ष शेख फिरोज शेख गुलाब ,शहर अध्यक्ष मोईन शेख , अब्दुल सादिक, आसिफ शेख ,याच्या स्वाक्षऱ्या आहे.