Home जळगाव पाचोरा नगरपरिषद चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना गणवेश वाटप

पाचोरा नगरपरिषद चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांना गणवेश वाटप

249

निखिल मोर

पाचोरा – ‌सफाई कर्मचारी यांचे पुर्वी दिलेले गणवेश खराब झाल्‍याने अनेक दिवसांपासून चतुर्थ श्रेणी कर्मचा-यांमधून गणेवशाबबात मागणी होती त्‍यावर नगराध्‍यक्ष संजय गोहील व मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांनी मे.सभेच्‍या मान्‍यतेने पाचोरा नगरपरिषदेतर्फे दिनांक 13/08/2020 रोजी नगरपरिषदेच्‍या शिपाई वर्गीय तसेच आरोग्‍य विभागाकडील सफाई कर्मचा-यांना प्रत्‍येकी 2 ड्रेस, टी शर्ट, जॅकेट व महिला सफाई कर्मचा-यांना 2 साडया / जॅकेट खरेदी करण्‍यात आले. गणवेशाचे वाटप लोकनियुक्‍ती नगराध्‍यक्ष संजय गोहील तसेच मुख्‍याधिकारी शोभा बाविस्‍कर यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आले.
यावेळी प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निरीक्षक दगडू मराठे, पाणीपुरवठा अभियंता जितेंद्र मोरे, प्रशास‍न लिपीक ललित सोनार, राजेंद्र शिंपी, किशोर मराठे, आकाश खैरनार, राकेश मिश्रा तसेच स्‍वच्‍छता कर्मचारी उपस्थित होते.