
जालना – जिल्ह्याच्या घनसावंगी तालुक्यातील जलसंधारण आणि शेतरस्ते कामाला गती मिळावी म्हणून प्रशासन आणि पदाधिकारी यांचा समनव्य आवश्यक असून या समन्यातून प्रत्येक गावातील पाणी आणि शेतरस्त्यांचेच प्रश्न कायमचे मिटतील, असे प्रतिपादन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केले.
भारतीय जैन संघटना व जिल्हा प्रशासनच्या वतीने घनसावंगी तालुक्यातील जलसंधारण आणि रस्ते कामाला गति मिळावी यासाठी १० jcb व १० पोकलेन मशीन देण्यात आलेल्या आहेत. विडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आरोग्य मंत्री राजेश टोपे बोलत होते.
याप्रसंगी आरोग्य मंत्री यांचे विशेष अधिकारी कैलास अंडील, तहसीलदार नरेंद्र देशमुख, आरोग्य सभापती कल्याण सपाटे, भारतीय जैन संघटनेचे तालुका सचिव नरेंद्र जोगड , नगराध्यक्ष राज देशमुख, नगरसेवक अॅड राजेश्वर देशमुख, नंदकुमार देशमुख, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्री जाधव, तालुका कृषी अधिकारी श्री रोडगे, सतिश होन्डा, भागवत रक्ताटे, भास्कर गाढवे, किशोर थोरात, रमेश धांडगे आदी उपस्थित होते.











































