Home विदर्भ अल्लीपुर – शिरसगाव रस्ताची ऐशी तैशी…!

अल्लीपुर – शिरसगाव रस्ताची ऐशी तैशी…!

179

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांना त्रास

वर्धा – जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात असलेले अल्लीपुर हे गाव मोठे असून आजू-बाजूच्या जवळपास चाळीस गावाचे केंद्रस्थान सुद्धा आहे.अल्लीपुर ते शिरसगाव या मार्गाचे मागील एक ते दीड वर्षापासून काम चालू असून पूर्ण काम झालेले नसल्याने अनेक नागरिकांना व शेतात जाणाऱ्या शेतकऱ्याना अडचणी येत आहे.सध्या कोरोनामुळे बस सेवा ग्रामीण भागात ठप्प असल्याने शिरसगाव,मनसावळी, येरणगाव, आर्वी,काचनगाव,सोनेगाव,या शेतकऱ्यांना पीक कर्ज,दवाखाना,बँक कामे, इत्यादी महत्वाच्या कामासाठी अल्लीपुर येथे दुचाकीवरून यावे लागते किंवा अल्लीपुर येथील शेतकऱ्यांच्या शिरसगाव शिवारात जमिनी असल्याने शेतात जावे लागते, मात्र पावसाळा सुरू असल्याने थोडासा पाऊस आला की काही ठिकाणी अपूर्ण असलेल्या रस्त्याची नाल्याच्या स्वरूपात दयनीय व्यवस्था होत असल्याने चिखलाचे साम्राज्य निर्माण होत असल्यांने नाहक त्रास सहन करावा लागत असून काही शेतकऱ्यांचे व नागरिकांचे अपघात सुद्धा झालेले आहे या कडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष असून सध्या काही दिवसांपूर्वी याच डी बी जैन कंपनी च्या गलथान कारभारामुळे व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या आशीर्वादाने पवनी जवळील नाला बांधकाम अपूर्ण असल्याने पवनी येथील अनेक शेतकऱ्यांची जमीन ही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे.करीता मधमधात अपूर्ण असलेल्या रस्तावर पावसाळा असल्याने या अपूर्ण रस्त्यावर दुचाकी घसरू नये म्हणून तात्काळ प्राथमिक मटेरियल टाकावे अन्यथा शिवराया विद्यार्थी संघटना चिखल अंगावर घेत आंदोलन करेल असा ईशारा पत्रकार यांच्याशी बोलताना संस्थापक,अध्यक्ष नितीन सेलकर यांनी दिला आहे.