Home उत्तर महाराष्ट्र सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीतून निराधाराना अन्नधान्य किराणा वाटप

सामाजिक कार्यकर्त्यांचे मदतीतून निराधाराना अन्नधान्य किराणा वाटप

508

नाशिक , दि. ०१ :- कोरोनाच्या काळात गाव,खेडे,पाडे येथील निराधार कुटुंबाची उपासमार होऊ नये म्हणून अनेकजण आपापल्या परीने अन्नपाकिटे पुरवत आला आहे.

एक सामाजिक ऋण म्हणून या कामात सामान्य कुटुंबातील कष्टकऱ्यांसाठी कार्यरत माया खोडवे,आनंद पगारे,राम खुर्दळ,एकनाथ बेंडकोळी यांनी हें कार्य आजही तितक्याच सहृद्यस्थ भावनेतून सुरू ठेवले आहे.
आपल्या ओळखीतल्या सामाजिक संवेदनशील मित्र माध्यमसाथी साक्षी गुलाटी, अलका स्वादी,दुर्गसंवर्धक गजानन दिपके,मावळा मित्र इंद्रजित पाटोळे,सामाजिक कार्यकर्ते जितेन्द्र भावे, अणि इतर सहयोगी यांच्या मदतीने मिळालेल्या अन्नधान्य किराणा थेट गरुजूपर्यंत पोहोचवण्याचे काम नाशिकच्या महिला सामाजिक कार्यकर्त्या,समुदाय पत्रकार तथा श्रमजीवी संस्थेच्या मायाताई खोडवे,जर्नलिष्ठ ऍक्टिव्हिजम फोरमचे प्रवर्तक,फिल्ममेकर्स आनंद पगारे,पत्रकार संरक्षण समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा सामाजिक माध्यमकर्मी राम खुर्दळ,ग्राम सामाजिक कार्यकर्ता एकनाथ बॅंडकोळी यांच्या प्रयत्नातून केलं आहे.
सध्या कोरोनाच्या संकटात अनेकांची घरची स्थिती दयनीय आहे,रोजगार गेला,व्यवसाय बसला,घरात किराणा नाही,बाहेर कोरोनाच्या संसर्गामुळे कामे मिळत नाही,मजुरी नाही,घरात कोण्ही कमवत नाही,विधवा महिलांची मोठी हलत आहे,अश्या कुटुंबांना थेट वस्ती व आदिवासी पाड्यांवर विधवा, निराधार, स्थलांतरीत मजुर रेशन मिळत नसलेल्या तसेच रोजगार नसलेल्या परिवारांना अन्नकिराणा मिळावा तो वाटप करण्यासाठी अविरतपणे सामाजिक कार्यकर्त्यांनी धडपड सुरू ठेवली आहे. तसेच नासिक शहरातील गरिब वस्तिमधील वृध्द,अपंग,स्थलांतरीत मजुर , कचरवेचक, घरकामगार यांना गेल्या 3 महिन्यापासून किराणा घरपोच करत आहेत. एकूणच कोण्हीही उपाशी राहू नये इतकाच उद्देश ठेवून ही मंडळी आजही हे कार्य करीत आहे. आजपर्यंत २५० हुन अधिक गरजूंना हे किराणा थेट वस्त्या आणि गावापर्यंत नेऊन दिला आहे. आणि समाजातील आर्थिक सक्षम व्यक्तींना अपिल करित आहेत की आपल्या आसपास कुणीही भुक राहणार नाही याची काळजी घ्यावी.असे आवाहनही या माध्यमकर्मीनी केलं आहे.