Home विदर्भ कठीण परिस्थितीतही विक्रांतने मिळवले उत्तुंग यश..!

कठीण परिस्थितीतही विक्रांतने मिळवले उत्तुंग यश..!

219

डॉक्टर बनून रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न…!

८९.२० टक्क्यासह दहावी उत्तीर्ण

यवतमाळ – उत्तरवाढोणा ता. नेर , नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या निकालात ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या उत्तुंग यशाची मालिका याही वर्षी कायम राहीली आहे. नेर तालुक्यातील उत्तरवाढोणा सारख्या लहानश्या खेड्यातील विक्रांत वसंत नेवारे या विद्यार्थ्यांने देखील अत्यंत कठीण परिस्थितीत व कोणतीही शिकवणी न लावता केवळ सातत्याने अभ्यास करून अतुलनीय यश संपादन केले आहे.

विक्रांत हा वसंतराव नाईक उच्च माध्यमिक शाळा, उत्तरवाढोणा चा विद्यार्थी असुन त्याने ८९.२० टक्के गुण प्राप्त करीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली. भविष्यात अधिक चांगला अभ्यास करून एक यशस्वी डॉक्टर होऊन रुग्णांची सेवा करण्याचे स्वप्न असल्याचे विक्रांतने सांगितले.

विक्रांतने आपल्या यशाचे श्रेय वडील वसंत नेवारे, आई दुर्गा नेवारे, मोठे वडील शंकर नेवारे, मोठी आई गुंफा नेवारे, भाऊ साहील नेवारे, शुभम नेवारे, बहिण श्रद्धा नेवारे तसेच वसंतराव नाईक उच्च माध्यमिक शाळा उत्तरवाढोणा च्या सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना दिले. त्याच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.