Home जळगाव सन्मान कोरोना योद्ध्यांचा , सत्कार जनसेवकांचा…

सन्मान कोरोना योद्ध्यांचा , सत्कार जनसेवकांचा…

184

रावेर (शरीफ शेख)

समस्त रावेर वासियांच्या वतीने सत्कार भूमिपूत्रांचा करण्यात आला, त्यांतील रावेर शहरातील डॉ. शेख लाल , डॉ. रविंद्र वानखेडे , डॉ. निलेश चौधरी सह डॉ,विनोद महाजन
हे प्रामुख्याने मागिल कित्येक महिन्या पासून कोरोना या सारख्या भिशण महामारी ला समोर जात आहोत पण काही लोकं जे आपले कर्तव्य प्रामाणिक पने बजावत असून आपल्या जनजीवनात आपली भूमिका पार पाडत आहेत त्यांचा सत्कार रावेर वासियांच्या वतीने रावेर नगरिचे कार्यसम्राट श्री राजेंद्र रामदास महाजन (उपनगराध्यक्ष रावेर नगर परीषद) यांनीं केला व त्यांचे आभार व्यक्त केले, हा सत्कार आहे रावेर शहरातील भूमी पुत्रांचा ज्यांनी रावेरची जनता संकट समयी असतांना कधी पाठ फिरवली नाही ,Covid सारख्या आजार मध्ये सुद्धा त्यांनी आपले कर्तव्य निभावले व रावेर तालुक्यातिल जनतेला आपले समजून स्वतः च्या जीवनाचा विचार न करता जनतेला उपचार दिले… व त्यांनी Covid सारखेच कित्येक पेशंट बरे केलेत, या मध्ये निमोणिया,टाईफाईड व फ्लू सारखं साथी चे आजार चालू असतांना सुद्धा पेशंट बरे केलेत, काही लोकांनी Covid_19 च्या भीती पोटी आपले हॉस्पिटल बंद ठेवलेत, पण या डॉक्टरांनी रावेर वासि संकट मधे असताना आपली जबाबदारी पार पाडली व डॉक्टर मध्ये खरचं देव असतो हे आज रावेर वासियांनी बघितलं .
आपला सेवक श्री राजेंद्र रामदास महाजन, उपनगराध्यक्ष रावेर नगर परिषद हे डॉ शेख लाल यांचा सन्मान करतांना दिसतं आहे.