Home नांदेड महावितरणाच्या कार्यालयात नंगानाच…!

महावितरणाच्या कार्यालयात नंगानाच…!

199

कर्मचाऱ्यांचा मुजोरपणा वाढला”

नांदेड , दि. ३१ :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणच्या बिलोलीच्या उपविभागीय कार्यालयात भोंगळ कारभार सुरु असून या न त्या कारणाने नेहमीच चर्चेत असणा-या बिलोली येथील महावितरणाचा सावळा गोंधळ पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. काही दिवसांपुर्वीच महावितरणाच्या अनुउपस्थित उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून सामाजिक कार्यकर्ते सुलेमान शेख यांनी निषेध केला होता. सदरील प्रकरण संपतो न संपतो तेवढ्यात पुन्हा एकदा महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला असल्याने बिलोलीच्या महावितरण कार्यालयात चाललय काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. पुर्व सुचना न देता सातत्याने वीज पुरवठा खंडीत केला जात असून यातच कोरोना सारख्या जागतिक महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वतःचे उखळ पांढरे करण्यासाठी वीज बिलांमध्ये अनेकांचे क्षमतेपेक्षा जास्त बिलांनी कंबर्डे मोडल आहे या बाबी नित्याच्याच मात्र या कार्यालयातील सावळा गोंधळ चव्हाट्यावर आला. तो कर्तव्ये बजावणा-या पैठणे नामक कर्मचाऱ्यांने भरदिवसा चक्क मद्य प्राशन करुन ग्रामीण भागातील ग्राहकांच्या तक्रारी ऐवजी त्यांचा मानसिक छळ करत उच्च स्वरात अरेरावी करत असल्याचे नागरिकांतुन बोलल्या जात असून या कर्मचाऱ्याचा मुजोरपणा वाढला असल्याने याकडे वरिष्ठांनी लक्ष घालून कारवाई करतील का? असा सवाल नागरिकांतुन होत आहे.