August 8, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

यवतमाळ जिल्हातील पुसद 50 , दिग्रस 44 , पांढरकवडा 20 , यवतमाळ 6 तर दारव्हा मध्ये 1 पॉझेटिव्ह

जिल्ह्यात 121 पॉझेटिव्ह रुग्णांची भर , 31 जणांना सुट्टी

यवतमाळ , दि. 31 :- जिल्ह्यात आतापर्यंत दुहेरी अंकात वाढणारी कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शुक्रवारी अचानाक तीन अंकात वाढली. ही आतापर्यंत एका दिवसात झालेली सर्वात मोठी वाढ आहे. आज (दि.31) रोजी जिल्ह्यात तब्बल 121 नवीन पॉझेटिव्ह रुग्णांची भर पडल्याने आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येने जिल्ह्यात हजारचा आकडा पार केला आहे. तर आयसोलेशन वॉर्ड आणि विविध कोव्हीड केअर सेंटरमध्ये भरती असलेले 31 जण उपचारानंतर बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.

आज नव्याने पॉझेटिव्ह आलेल्या 121 जणांमध्ये 66 पुरुष व 55 महिलांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 50 रुग्ण पुसदचे, 44 रुग्ण दिग्रसचे, पांढरकवडा येथील 20 रुग्ण, यवतमाळचे सहा तर एक रुग्ण दारव्हा येथील आहे. यात यवतमाळ शहरातील साईनाथ लेआऊट येथील एक महिला, यवतमाळ शहरातील पोलीस हेड क्वार्टर येथील एक पुरूष, तेलीपुरा येथील एक पुरुष, लक्ष्मीनगर येथील एक महिला, चिंतामणी नगरी वाघापूर येथील एक पुरूष, यवतमाळ शहरातील एक पुरूष, पुसद येथील द्वारका नगरीमधील दोन पुरूष, गांधी वार्ड येथील एक महिला, वार्ड नंबर एक मधील एक पुरूष व दोन महिला, रामनगर येथील एक पुरूष, पुसद शहरातील 23 पुरुष व 20 महिला, दिग्रस येथील शास्त्री नगरातील एक महिला, गवळीपुरा येथील एक पुरूष, दिग्रस शहरातील 21 पुरूष व 21 महिला, दारव्हा शहरातील किला मजीद येथील एक महिला, पांढरकवडा येथील 13 पुरूष व सात महिला पॉझेटिव्ह आले आहेत.

जिल्ह्यात गुरवारपर्यंत 361 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्ण होते. यात शुक्रवारी 121 नवीन रुग्णांची भर पडल्याने हा आकडा 482 वर पोहचला. मात्र ‘पॉझेटिव्ह टू निगेटिव्ह’ झालेल्या 31 जणांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्याने सद्यस्थितीत जिल्ह्यात ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 451 आहे. जिल्ह्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 1074 झाली आहे. यापैकी 596 जण बरे झाल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. तर जिल्ह्यात 27 मृत्युची नोंद आहे. सद्यस्थितीत आयसोलेशन वॉर्डात 104 जण भरती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाने शुक्रवारी 53 नमुने तपासणीकरीता पाठविले. महाविद्यालयाने सुरवातीपासून आतापर्यंत 17123 नमुने पाठविले असून यापैकी 14218 प्राप्त तर 2905 अप्राप्त आहेत. तसेच 13144 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रशासनाने कळविले आहे.

Advertisements

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!