
पोलीसवाला ऑनलाइन मिडिया
जालना / अंबड , दि. २९ :- शेतात आई वडिलांना मदत करून , रोज शाळेत तीन किलोमीटर पायी जाऊन वडीकाळ्या येथील सीता विलास काळे हिने दहावीच्या परीक्षेत ९०.९० टक्के मार्क घेऊन सुखापुरी हायस्कूल मधून दुसरा क्रमांक पटकावला आहे.
सीता काळे हिने या यशाने परिसरात वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
प्रतिकूल परिस्थितीत आई वडिलांना शेतात कामाला मदत करून सकाळी लवकर उठून 3 किलोमीटर अंतरावर पायी जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले आहे.
वडीकाळ्या येथील शेतकरी विलास काळे यांना 4 एकर शेती असून त्यांना 4 मुली व 1 मुलगा आहे त्याच्या चारही मुली खूप हुशार आहेत त्यामध्ये सर्वात मोठी असलेली सीता तिने वर्षभर शाळा करुन,आपल्या आई वडिलांना शेतात आणि घरकामात मदत करून हे यश मिळवले आहे त्यामुळे तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
समईच्या उजेडात केला अभ्यास – विलास काळे हे शेतात रहात असल्यामुळे शेतात नेहमीच लाईट जात असते त्यामुळे सीता घरामध्ये समई पेटून ठेवत असे आणि त्या उजेडात अभ्यास करत असे. सीता ने सुखापुरी हायस्कूल मधून दुसरा क्रमांक पटकावला आहे तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.











































