Home नांदेड माहूर : रस्ता न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

माहूर : रस्ता न झाल्यास शिवसेनेचा आंदोलनाचा ईशारा

231

मजहर शेख

नांदेड / माहूर , दि. २३ :- माहूर शहरातील वार्ड क्र.1 तहसिल कार्यालया मागील बी.एन.नगर ह्या भागास शहरास जोडणारा रस्ता नसल्याने तेथील नागरीकांना पावसाळ्यात दळण वळणास त्रास होत असल्याने मागील साडे तिन वर्षापासुन सदर नगरातील नागरीक माहूर नगर पंचायतकडे लेखी व तोंडी विनंती करुन सुद्धा पावसाळ्याचे दिवस असल्याने रहदारी, पाणी टँकर तर सोडाच पण साधे पैदल चालने सुद्धा दुरापास्त झाले असल्याने मागणी करत आहे.
सन 2015-16 मध्ये नगर पंचायत मार्फत सी.सी.रस्त्याचे काम झालेल्या रस्त्या पासुन ते महात्मा फुले नगर सी.सी.रस्ता हे फक्त 100 फुटाचे अंतर जोडल्यास बी. एन. नगर वासियांच्या रस्त्याचा प्रश्न निकाली काढता येते परंतु मागील साडेतीन वर्षापासुन हे काम होत नसल्याने शिवसेना शहर प्रमुख निरधारी जाधव यांनी दि.23 रोजी निवेदनाद्वारे सदर रस्ता तात्काळ करुन द्या अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल असा ईशारा दिला आहे.
सदर निवेदनाच्या प्रति नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे, पालकमंत्री ना.अशोकराव चव्हाण, खासदार हेमंत पाटिल, शिवसेना उपजिल्हा प्रमुख तथा नांदेड जिल्हा नियोजन समिती सदस्य ज्योतिबा खराटे, नगरसेवक रहेमत अली, शिवसेना गटनेते दिपक कांबळे, नगरसेवक ईलियास बावाणी ईत्यादिंना दिल्या आहे.
सध्या पावसाळा सुरु असल्याने बी. एन. नगरातील नागरीकांचे रस्त्या विना होणारे हाल व त्यात शहरात पक्क्या रस्त्यावर होणारे रस्ते पाहता बी.एन.नगरातील नागरीकांची मागणी रास्त असल्याची प्रतिक्रीया युवासेना तालुका प्रमुख विकास कपाटे, अजीज भाई, नाना लाड, शहर प्रमुख खुशाल तामखाने, संदिप गोरडे, सुरेश आराध्ये तसेच नगरसेविका : सौ.प्रिया राजाराम गदेवाड, सौ.मिना रुपेश कोवे, सौ.सुधाताई दत्तराव कपाटे, सौ.दिपाली नाना लाड, शरीफाबी शे.अजिज, सौ.आशा निरधारी जाधव यांनी दिली आहे.