Home विदर्भ पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या विदर्भ उपाध्यक्ष पदी योगेश कांबळे यांची नियुक्ती.!

पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या विदर्भ उपाध्यक्ष पदी योगेश कांबळे यांची नियुक्ती.!

133

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – पोलीस मिञ परिवार समन्वय समितीच्या विदर्भ उपाध्यक्ष पदी योगेश कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
योगेश कांबळे हे पञकार असून ते ग्रामीण भागातील अभ्यासू व्यक्तीमत्व आहे. सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात संघर्षाची धडपड पाहुन पोलिस प्रशासन,पोलिस परिवार, शासन व प्रशासन यांच्यावर विविध प्रकारे होत असलेले अन्याय तसेच सर्व सामान्य नागरिकांचा न्याय हक्कासाठी सहकार्य करुण न्याय मिळवून देण्यासाठी 1 जानेवारी 2020 पासुन ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत पोलिस मित्र परिवार संमन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्याकडुन विदर्भ उपाध्यक्ष पदी नियक्ती करण्यात आली आहे.
संवीधानाचे व समितीचे नि:स्वार्थपणे, समर्पीत भावनेने वरिष्ठांच्या आदेशाचे व त्यांच्या श्ब्दांचे पालन करुण समितीच्या ध्येयधोरनात राहून विदर्भात काम करण्याची संधी महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष डाॅ. संघपाल उमरे यांनी नियुक्ती पञ देवून केली आहे.
योगेश कांबळे यांच्या निवडीबद्दल डाॅ.मनोज भांगे, पञकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पञे , राम खुर्दळ , शेख सत्तार , विजय पचारे , पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष रमेश ढोकणे , माजी शिक्षण सभापती मोरेशवरराव खोडके , डाॅ.दीपक कोल्हटकर , सरपंच मिलींद खोडके उपसरपंच मनोज नागपूरे , पोलीस समन्वय समितीच्या महिला अध्यक्षा सौ.पदमाताई मुंजेवार , दादाराव मुन , पंकज गादगे रविराज घुमे ईकबाल शेख , मयुरअवसरे , प्रकाश झाझंडे, किरण ठाकरे,गणेश शेंडे यांच्या सह अनेकांनी आनंद व्यक्त केला.