Home नांदेड देगलूर कोरोना केअर सेंटर उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांची गैरसोय

देगलूर कोरोना केअर सेंटर उपजिल्हा रूग्णालयात रूग्णांची गैरसोय

129

नांदेड , दि.१३ ( राजेश एन भांगे ) – नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील कोरोना केअर सेंटर उपजिल्हा रूग्णालयात अॕडमिट असलेल्या कोरोना बाधित व्यक्तींना रूग्णालय प्रशासनाने वाय्रावर सोडले असुन बाधित व्यक्तींना ना सकाळचा नास्टा ना पुरेसे जेवन निट वेळेवर दिले जाते तसेच ना पिण्यासाठि पुरेस पाणी सुद्धा उपलब्ध नसुन बाधित आणि संशयीत कोरोना रूग्णास एकाच ठिकाणी ठेवले असुन टाॕयलेट, व बाथरूम सुद्धा सर्वांसाठी एकच वापरावे लागत असल्याने तेथे अॕडमिट झालेल्या नागरिकांत भितीचे वातवरण निर्माण झाले असुन रूग्णालय प्रशासनाच्या हलगर्जी पणामुळे उपस्थित व्यक्तींच्या अरोग्यास आणखीनच जास्त धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाहि. तरी पालकमंत्री व जिल्हाधिकारींनी या प्रकरणात गांभिर्याने लक्ष घालुन रूग्णांना लागणाऱ्या सर्व सुविधा तात्काळ उपलब्ध करून द्यावे आणि रूग्णांच्या आरोग्याशी खेळणाय्रा रूग्णालयातील दोषि अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी सामाजिक संघटे कडुन व सर्व स्तरातुन होत आहे.