Home विदर्भ विशेष पथकाच्या छाप्यात 35 लाखांचा मूद्देमाल जप्त……

विशेष पथकाच्या छाप्यात 35 लाखांचा मूद्देमाल जप्त……

24
0

19 आरोपी विरुध्द गुन्हा दाखल….

देवानंद खिरकर

अकोट – जिल्हा पोलिस अधीक्षक यांच्या पथकाने हिवरखेड पोलिस स्टेशन अंतर्गत येणार्या ग्राम चंदनपूर येथिल जूगारावर छापा मारुन 35 लाखांचा मूद्देमाल जप्त केला आहे.या विरुध्द 19 जणांविरध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चंदनपूर येथिल युसूफ खा यांच्या घरात जुगार सुरु असल्याची माहिती मिळाल्या नंतर हा छापा टाकण्यात आला.या ठिकाणी भास्कर नामदेव मानकर रा.बोर्डी,सैय्यद फारुक सैय्यद मूजफ्फर,कैलाश महादेव धुळे रा.अकोट,अजय शंकर गावंडे,अनुराग प्रकाश अग्रवाल,शेख रशिद शेख युसूफ,हरिष सुरेशसिंग मलिये,निसार हुसेन शहा,रा तेल्हारा,गोपाल प्रल्हाद इंगळे रा.माळेगाव बाजार,युसूफ खान शेख सादीक उर्फ अब्दुल सादीक,शेख सलाम रा.हिवरखेड,संतोष रामगीर गिरी,सिध्दार्थ फकिरा वानखडे,राजेश बळीराम चोपडे,सतिष गोपाल झगडे,रा.बानोदा एकलारा,नासीर खान बशिर खान रा.शिवपूरा जळगाव जामोद,अनवर अली हशमत अली,शकिर शहा इब्राहीम शहा रा.अंजनगाव सुर्जी,तर संदीप खारोडे रा.नाथ नगर तेल्हारा हा पळून जाण्यात यशस्वी झाला. अशा 19 जणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला. घटनास्थळावरुन 2 लाख 79 हजार रुपये रोख रक्कम,3 चार चाकी गाड्या,5 मोटारसायकल,17 मोबाइल,व जुगाराचे साहीत्य असा एकुण 35 लाख 30 हजार 870 रुपयेचा येवज जप्त करण्यात आला.सदरची कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक मा.श्री.जी.श्रीधर,मा.श्री.अप्पर पोलिस अधीक्षक प्रशांत वाघुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोला पथकाने केली आहे.

Unlimited Reseller Hosting