Home महाराष्ट्र सुनील शिंदे शरणपूर वृद्धाश्रमास दरमहा मदत करणार

सुनील शिंदे शरणपूर वृद्धाश्रमास दरमहा मदत करणार

120

पोलीसवाला ऑनलाइन मिडिया

ठाणे – येथील रहिवासी श्री सुनील शिंदे यांनी शरणपूर वृद्धाश्रमास दरमहा १५०० रुपयांची मदत करण्याचे ठरविले आहे. त्यांचे हे पाऊल इतरांना निश्चितच प्रेरणा देणारे ठरेल. या महिन्याच्या मदतीपोटी त्यांनी नुकत्याच निधन पावलेल्या त्यांच्या वडलांच्या तेराव्या निमित्ताने आज दिनांक १३ जुलै रोजी वृद्धाश्रम वासियांसाठी गोड जेवण दिले आहे. यासाठीचे २७०० रुपये त्यांनी वृद्धाश्रमाकडे जमा देखील केले आहेत. यापूर्वीची मदत ठाण्याचे संवेदनशील पोलीस आयुक्त श्री विवेक फणसळकर १० हजार०१ रुपये, श्री राजेंद्र रघुनाथ खांडपेकर ३ हजार रुपये, डॉ आशिष शिरूरकर, नवी मुंबई ११०० रुपये, श्री प्रदीप क्षीरसागर सर,औरंगाबाद १ हजार रुपये, श्री अभय पाटील, पुणे १ हजार रुपये, आस्था फौंडेशन,औरंगाबादचे श्री गिरीश हंसराज ३ हजार रुपये, डॉ. नरेंद्र वैद्य, औरंगाबाद २ हजार रुपये, श्री कालिका कन्स्ट्रक्शन, पुणेचे श्री रवींद्र लाळे २१०० रुपये, श्री रवींद्र मनकीकर सर,औरंगाबाद १५०० रुपये, मलेशियातील श्री प्रशांत टांकसाळे ५ हजार रुपये, जळगाव येथील श्री पी बी पाटील २१०० रुपये, नवी मुंबई येथील रचना ठाकरे २००१ रुपये , नाशिक येथील सौ सोनल नितीन कदम ५०० रुपये, युको बँक,मुंबईचे अधिकारी श्री गोपीनाथ तुळसनकर, ५ हजार रुपये, पोलीस उपअधीक्षक सुनीता नाशिककर, मुंबई, ५ हजार रुपये, निवृत्त माहिती संचालक देवेंद्र भुजबळ,मुंबई, २७००,युको बॅंकेचे निवृत्त सहायक सर व्यवस्थापक श्री वामनराव सातनूरकर, नागपूर २५०० रुपये, सौ आशाताई अशोकराव कुंदप, सातारा, १५०० (नुकत्याच दिवंगत झालेल्या त्यांच्या आई श्रीमती सुभद्राबाई शंकरराव इंदापुरे यांच्या स्मरणार्थ ) श्रीमती मोहिनी सुभाष तंटक,सातारा १५००, लेखिका रश्मी हेडे २ हजार रुपये , निवृत्त एस टी अधिकारी श्री लक्ष्मीकांत विभूते, नवी मुंबई,१ हजार, पत्रकार सविता कोल्हे,नाशिक ५००/- रुपये या प्रमाणे मदत केली आहे. या सर्व दान शुरांनी मदत करून या वृद्धाश्रमास नव संजीवनी मिळवून दिली.

याबद्दल वृद्धाश्रमाचे संचालक श्री रावसाहेब मगर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. निवासी वृद्धांकडून एकही पैसा न घेता पूर्णपणे सेवाभावी वृत्तीने चालविण्यात येणाऱ्या अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यातील या शरणपूर वृध्दाश्रमात १६ वृद्ध व ४ कर्मचारी असे २० जण आहेत. कोरोनामुळे सध्या लॉक डॉउन सुरू आहे. त्याचा परिणाम वृद्धाश्रमावर झाला असून त्यांची किराणा मालाची व अन्न धान्याची अतिशय अडचण निर्माण झाली आहे, त्यामुळे या वृद्धाश्रमास मदत करावी , असे आवाहन करण्यात आले आहे. रावसाहेब मगर त्यांच्या पत्नी व सहकारी येथील वृद्धांची अतिशय आत्मीयतेने देखभाल करत असतात. आपण आपली यथाशक्ती मदत पुढील बँक खात्यात जमा करू शकता. अक्षय ग्रामीण युवा व क्रिडा व सामाजिक विकास संस्था, मक्तापूर,ता- नेवासा, जिल्हा-अहमदनगर, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा-नेवासा,

खाते क्रमांक – 60070064850.IFSC code- MAHB0000147. मदतीनंतर कृपया आपले नाव,पत्ता, मोबाईल क्रमांक अवश्य कळवावा, जेणेकरून आपणास पावती पाठविणे शक्य होईल. श्री रावसाहेब मगर यांचा मोबाईल क्रमांक :7775015063.

देवेंद्र भुजबळ :9869484800.