Home सोलापुर मुंबई राजगृहावरील हल्ल्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध

मुंबई राजगृहावरील हल्ल्याचा पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने निषेध

129

सोलापुर – राष्ट्रिय अध्यक्ष माजी आमदार प्राध्यापक जोगेन्द्रजी कवाडे,राष्ट्रिय कार्याध्यक्ष जयदिपभाई कवाडे व राज्य उपाध्यक्ष राजाभाऊ इंगळे यांच्या पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वात मुंबई राजगृहावरील हल्ल्याचा निषेध करून कड़क कायदेशीर करवाईची मागणी उपविभागीय अधिकारी शमा पवार यांचेकडे निवेदन देऊन करण्यात आली.

भारतीय घटनेचे निर्माता,विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई येथील राजगृह या ऐतिहासिक वास्तुवर मंगळवारी 7 जुलै रोजी समाजकंटकाकडून हल्ला करण्यात आला होता या घटनेचा निषेध व कडक करवाई करण्याची मागणी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या नेतृत्वात मुख्यमंत्री व गृहमंत्री यांचेकडे उपविभागीय अधिकारी अकलूज यांना निवेदन देऊन करण्यात आली.
यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुकाध्यक्ष बॉबी वाघमारे,तालुका संघटक हेमंत कांबळे,अकलूज शहराध्यक्ष मिलिंद पवार,युवक तालुका कार्याध्यक्ष सचिन कांबळे,संपर्क प्रमुख शिवम गायकवाड,विनोद सावंत,शहर संपर्क प्रमुख शिवाजी खड़तरे,महावीर निकम,महेश ऐडके,अजित डावरे यांचेसह प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते