Home विदर्भ वर्धा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वीजबिल वापसी आंदोलन.!

वर्धा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वीजबिल वापसी आंदोलन.!

211

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या आदेशानुसार वर्धा जिल्ह्याच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तालुक्यात वीजबिल वापसी आज दहा जुलै रोजी आंदोलन करण्यात आले.
वर्धा येथे मुख्य अभियंता बोरगाव कार्यालय याना विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष सचिन डाफ़े यांचे नेतृत्वात कोरोनाकाळातील वीजबिल वापस देऊन मुख्यमंत्री व ऊर्जामंत्र्यांना वीजबिल परत करत असून कोरोनाकाळातील वीजबिल भरणार नसल्याचे निवेदन पाठवून हि वीजबिल पूर्णपणे माफ करण्यात यावे तसेच विदर्भातील विजेचे दर यापुढे निम्मे करण्यात यावे व शेतकऱ्यांना वीजबिलातून मुक्त करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनातं विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी तालुका प्रमुख मुकेश ठाकूर , महिला शहर प्रमुख माधुरीताई पाझारे,युवा आघाडी शहर प्रमुख विशालसिंग कछवाह जनक्रांती सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष प्रसाद कोडगिरवार, कार्तिक पाठक व सामाजिक कार्यकर्ते विलासन्जी मोखाडे व नागरिक उपस्थित होते.
अल्लीपूर येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती विद्यार्थी आघाडी जिल्हाप्रमुख विद्यार्थी मित्र नितीन सेलकर व शेतकरी संघटना युवा आघाडीचे माजी जिल्हाप्रमुख कैलासभाऊ घोडे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळी माजी सरपंच गजानन नरड व शिवराय विद्यार्थी संघटनेचे उपाध्यक्ष विकास गोठे, सचिव मयूर डफ., आकाश घुसे, श्रुनय ढगे, रोशन नरड, समीर मेघरे,ऋषिकेश कोमुजवार, निशांत लांभाडे व कार्यकर्ते हजर होते.
पुलगाव येथे विदर्भ राज्य आंदोलन समिती युवा आघाडी शहर प्रमुख वैष्णव ढोले व शेतकरी संघटना युवा आघाडी प्रमुख प्रफुल झाडे यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले यावेळेस कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंजी मोठी येथे शेतकरी संघटना युवा आघाडी तालुकाप्रमुख विशाल फाळके व शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते महादेवराव गोहो यांचे नेतृत्वात वीजबिल वापस करण्यात आले यावेळेस केशवराव फाळके, किशोर रुईकर. संतोष हाडके.बाळा मिसाळ, मोरूभाऊ मोरूभाऊ जाधव, गजानन कडू, दिलीप खडतकर, चरण पेटकर यांचेसह परिसरातील नागरिकांनी सहभाग नोंदविला.
हिंगणघाट येथे शेतकरी नेते मधुभाऊ हरने, तर समुद्रपूर येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाप्रमुख उल्हास कोटमकर, आर्वी येथे शैलाताई देशपांडे यांचे नेतृत्वात वीजबिल वापसी आंदोलन करून सरकारला संपूर्ण वीजबिल माफ करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.