Home विदर्भ केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आयटक चे वर्धा शहरात...

केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ आयटक चे वर्धा शहरात सात ठिकाणी देशव्यापी प्रतिरोध आंदोलन

897

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

वर्धा – देशातील ११ कामगार संघटनेच्या आवाहना नुसार वर्धा शहरात आयटक च्यावतिने जिल्हाधिकारी कार्यालय डॉ आबेडकर पुतळा (जिल्हा परिषद) शिवाजी चौक ठाकरे मार्केट बजाज चौक बोरगांव नाका नालवाडी या सात ठिकाणी कामगारांच्या प्रलंबीत मागण्यां व केंद्र व राज्य सरकारच्या कामगार विरोधी धोरणाच्या निषेधार्थ देशव्यापी प्रतिरोध आंदोलन करण्यात आले.

मागण्याचे निवेदन पंतप्रधान मुख्यमंत्री यांच्या नावे मा.जिल्हाधिकारी यांच्या मार्फत देण्यात आले. राज्य शासनाने आशा गट प्रवर्तक यांना देवू केलेली मानधन वाढ १ सप्टेंबर १९ पासून लागू करावी इत्यादी योजना कामगारांच्या खालील मागण्या तात्काळ निकाली काढण्यासाठी आयटक राज्य उपाध्यक्ष काँ दिलीप उटाणे यांच्या मार्गदर्शनात निवेदन सादर केले
मागण्या…
१) केंद्र सरकारने रद्द केलेले संविधानातील ४४ कामगार कायदे व केलेला बदल त्वरीत मागे घ्या.
२)अंगणवाडी सेविका मदतनिस .आशा गटप्रवर्तक शालेय पोषण आहार कर्मचारी
आरोग्य उपकेंद्रातील अंशकालीन स्त्री परिचर व NHM कर्मचाऱ्यांना यांना शासकीय कर्मचाऱ्यांनचा दर्जा देवून किमान वेतन व सामाजिक सुरक्षा लागू करा.
३) केंद्र सरकारच्या ५ जुलै २०१८ च्या शासकीय आदेशानुसार *अ*) प्रधानमंञी जीवनज्योती विमा योजना *ब*) प्रधानमंञी सुरक्षा विमा योजना *क*) अंगणवाडी कार्यकर्ती विमा योजना लागू केल्या आहेत .परंतु अजून पर्यत कर्मचाऱ्यांना लाभ देण्यात आलेला नाही त्याची तंतोतंत अमंलबजावणी करण्यात यावी व त्याचे फायदे तात्काळ अंगणवाडी कर्मचाऱ्यांना व आशा गटप्रवर्तक यांना देण्यात यावी
४) भारतात मोठ्य प्रमाणात कोवीड १९ चा प्रादुर्भाव वाढत आहे याला आळा घालण्यासाठी आशा गटप्रवर्तक अंगणवाडी कर्मचारी .आरोग्य कर्मचारी अंशकालीन स्त्री परिचर आपल्या जीवाची परवा नकरता काम करीत आहेत . काम करीत असताना अनेक अंगणवाडी आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला परंतु केंद्र सरकारने जाहीर केलेल्या विमा योजनेत कोवीड १९ ने बाधीत झाल्याने मृत्यू झाल्यास ५० लाख रुपये देण्यात येईल असे म्हटले आहे त्यामुळे जोखमीचे काम करीत असताना लाभ मीळू शकत नाही ,त्यामूळे केंद्र सरकारच्या शासन निर्णयात बदल करुन कोवीड १९ किंवा या काळात कोणत्याही कारणाने मृत्यू झाल्यास तात्काळ कुटुंबाना विमा लाभ देण्यात यावा . कोवीडचे लक्षणे उशीरा दिसून येतात त्यामुळे एक वर्ष कालावधी साठी विमा उतरविण्यात यावा.
५) एकात्मीक बाल विकास सेवा योजनेचे केंद्र सरकारने घेतलेल्या खाजगीकरण निर्णय मागे घ्या.
६) कोवीड १९ व लाकडाऊन मुळे शाळा बंदअसून पोषण आहार कर्मचाऱ्यांचा काम बंद झाल्यामुळे शापोआ कर्मचाऱ्यांच्या कुटुंबावर उपासमारची वेळ आली असून तात्काळ शापोआ कर्मचाऱ्यांना ५ हजार प्रतिमहा आर्थिक मदत देण्यात यावे
६) एकात्मीक बालविकास सेवा योजना व राष्ट्रीय आरोग्य अभियान ही केंद्र पुरस्कृत असून अंगणवाडी आशा गटप्रवर्तक .कंञाटी नर्सेस अंशकालीन स्त्री परिचर अने वर्ष सेवा दिल्यानंतर सेवानिवृत्त झाल्यास त्यांना कुठलाही लाभ मिळत नाही त्यामूळे म्हातारपणी पेंशन देण्यात यावी,

७) प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर आरोग्य उपकेंद्रात कार्यरत अंशकालीन स्त्री परिचर यांना केंद्र सरकार प्रति फक्त १००/- रुपये मानधन देण्यात येते .स्त्री परिचर पुर्णवेळ आरोग्य सेवा देतात त्यामुळे अंशकालीन स्त्री परिचरांना किमान वेतन देण्यात यावे .
८) केंद्र सरकार आशा गट प्रवर्तक यांना कामावर मोबदला देतो . उत्तम आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचारी आहेत गट प्रवर्तकांना २५ हजार तर आशा वर्कर यांना २१ हजार रुपये प्रतिमहा ठरावीक वेतन देण्यात यावे,
इत्यादी मागण्या तात्काळ सोडविण्यात याव्या.
९) केंद्र सरकारने पेट्रोल डिझेलची केलेली भरमसाठ वाढ मागे घ्य.
१०) लाकडाऊन काळात बाधकाम कामगारांचा रोजगार गेल्यामुळे प्रत्येक महिन्याला ७५००/- रुपये अनुदान द्या
११) लोकसभेची नविन इमारत बाधन्यापेक्षा त्या पैसाने देशातील आरोग्य यंञणा मजबूत करा
१२) लाकडाऊन काळातील विजेचे बिल माफ करा
१३) मा.आयुक्त एकात्मी बालविकास मुंबई यांच्या १ जुलै ०२० च्या पञानुसार अंगणवाडी केंद्र उघण्याचे आदेश आहेत मुलांसाठी व अंगणवाडी कर्मचाऱ्यांसाठी मास सानेटायझर आवश्यक असलेले सर्व साहित्य उपलब्ध करुन द्या .नंतरच अंगणवाडी केंद्र सुरु करा.शाळा बंदअसल्यामुळे अंगणवाडी सुरु करण्यात येवू नये.
१४) इलेक्ट्रिसिटी संशोधित बिल २०२० त्वरीत रद्द करा
आंदोलन सामाजिक अंतर ठेवून वर्धा शहरात डॉ आंबेडकर पुतळा गांधी पुतळा बजाज चौक शिवाजी चौक ठाकरे मार्केट (शापोआ कर्मचाऱ्यांचा मुक आंदोलन ) जिल्हा परिषद. नालवाडी आंबेडकर पुतळा आयटक संलग्न विविध संघटनेच्या वतिने देशव्यापी आवाहनानुसार करण्यात आले.