July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

भूमीपुत्रांनी आपल्या बाप्पाच्या हक्कासाठी सायकल ने गाठलं अल्लीपुर वरून हिंगणघाट

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्याशिवाय शांत बसनार नाही – विद्यार्थीमित्र नितीन सेलकर

वर्धा – सोयाबीन बियाणे पेरणी केल्यानंतर बियाणे न-उगवणे च्या आलेल्या शेतकऱ्यांच्या तक्रारी ला असुसरून हिंगणघाट येथील तहसीलदार यांना अल्लीपुर येथील भूमीपुत्रांची सायकल ने प्रवास करत निवेदन देत लक्ष वेधण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की खरीप हंगामाची सुरुवात झाली व सोयाबीन पेरणीसाठी पुरेसा पाऊस आल्या नंतर जवळपास सर्वच शेतकऱ्यांची पेरणी आटोपली,मात्र एकूण झालेल्या पेरणीपैकी ८० % शेतकऱ्यांची शासकीय प्रमाणित बियाणे कंपन्या व महामंडळाची खरेदी केलेली सोयाबीन बियाणे उगवले नाही यात शेतकऱ्यांचे संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले.
शासनाकडून प्रमाणित बियाणे कंपन्या व प्रमाणित महामंडळाच्या बोगस बियाण्यामुळे शेतकऱ्यांचे झालेले संपूर्ण हंगामाची नुकसान भरपाई,सोयाबीनची पेरणी केलेल्या शेताचे पंचनामे कृषी विभाग,महसुल विभाग, यांचे विभागा मार्फत करून त्वरित एकरी अंदाजे उत्पादन १० quintle पकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून गेलेल्या प्रत्येकी एकराची ३०,००० रुपयांप्रमाणे नुकसान भरपाई देण्यात यावी,व शेतकऱ्यांवर येणारे अशे संकट ओळखून जनुकीय ht bt बियाण्यांना परवानगी देऊन भविष्यात अश्या प्रकारचे शेतकऱ्यांचे होणारे नुकसान थांबवावे ही मागणी प्रामुख्याने करण्यात आली.
एकीकडे बँक कर्ज देण्यास विलंब करत आहे तर दुसरीकडे शेतकऱ्यांचा कोरोना मुळे उशिरा विकलेल्या मालाचे पैसे ही मिळाले नाही आणि कृषी केंद्र दुकान दार सुद्धा उधार देण्यास नकार देत आहे अशात जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकरी बाप्पाने आपली ऐशी तैशी करून सोयाबीन बियाणे विकत घेतले मात्र ते सुद्धा उगवले नसल्याने शेतकरी पूर्ण पणे हताश झालेला आहे त्यामुळे आपल्या बापाला न्याय मिळवून देण्यासाठी म्हणून आज शिवराया विद्यार्थी संघटना संस्थापक,अध्यक्ष नितीन सेलकर यांच्या नेतृत्वात सायकल ने अल्लीपुर ते हिंगणघाट अंतर गाठत तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले यावेळी विकास गोठे,रोषन नरड,मयूर डफ,श्रुनय ढगे, समीर मेघरे,दिनेश गुळघाणे,आकाश घुसे,कैलास घोडे,ऋषिकेश कोमुजवार व शेतकरी उपस्थित होते.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!