Home विदर्भ आलेगाव येथे कोरोनाची no entry साठी ठाणेदार वनारे सज्ज

आलेगाव येथे कोरोनाची no entry साठी ठाणेदार वनारे सज्ज

108

प्रा.मो.शोएबोद्दीन

अकोला – आलेगाव पातूर तालुक्यातील आलेगाव येथे कोरोनाची ऐट्री होऊ नये या साठी चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांनी आज 30 जुन रोजी येथील नागरिक ग्रामपंचायत व पत्रकारा सोबत बैठक घेतली.

अकोला जिल्ल्यात कोरोनाचा वाढता प्रादुभाव पाहता ,व अलेगाव पासून जवळ असलेले पिंपळखुटा,मळसुर येथे निघालेले रुग्ण पाहता अलेगावात कोरोनाची ऐट्री होऊ नये त्या करीता चान्नी पोलीस स्टेशनचे ठाणेदार गणेश वनारे यांनी 30 जुनला शारेरिक अंतर ठेऊन एक बैठक घेतली त्या बैठकीत नागरिकांना नियमाचे पालन शारेरिक अंतर व मास्क लाऊनच घरातून बाहेर पडण्या बद्दल सांगीतले त्या सोबत अतिअआवश्यक गरज असल्या शिवाय घरातून बाहेर न निघण्याचा सल्ला दिला व नागरिकांनी , शासन पोलीस प्रशासनाचा साथ दिलातर आपण लवकरच कोरोनाला मात देऊ शकतो , सोबतच आज ग्रामपंचायत प्रशासनाने तातळीने बैठक घेऊन नियमाचा पालन न करणाऱ्या वर दंड अकारण्याचा निर्णय घेतला ज्या मध्ये दुकानदाराने नियमाचे पालन न केल्यावर 1000 रुपय व मास्क ना लावल्यावर 100 रुपय दंड वसुलण्याचा निर्णय घेतला तरी ग्रा.पं. प्रशासनाने नागरिकांना आव्हान केले आहे की ते मास्क लावल्या शिवाय घरातुन बाहेर पडू नये व दुकानदारांनी सुद्धा नियमाचा पालन करावे.