Home विदर्भ चार महिन्यांची सरसकट विज बिल माफी करावे…!

चार महिन्यांची सरसकट विज बिल माफी करावे…!

112

विज बिलाची होळी करुन विज बिल माफ होनार नाहि, शैलेष अग्रवाल.

इकबाल शेख

वर्धा – जिल्हा आर्वी तालुका गेल्या चार महिन्यात देशावर आलेल्या कोरोना संकटात महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात होरपळून निघाला आहे. मा. मुख्यमंत्री साहेबांनी या संकटाचा सामना करण्यासाठी नागरिकांना केलेल्या ताळेबंदी आव्हानाला प्रतिसाद देत जनतेने पूर्ण नियम अटी चे पालन केले आणि खऱ्या अर्थाने महाराष्ट्र राज्यात कोरोना संसर्गाला थांबवण्यासाठी मोठी मदत नागरिकांने शासन प्रशासन झाली.
मोठया प्रमाणात निमशासकीय नोकऱ्या गेल्या रोज मजुरी करणारे सर्व कामगार, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, हमाल, ड्रायव्हर, नाभिक कर्मचारी ,बँड व्यावसायिक,पानटपरी वाले, हॉटेल, व असे अनेक व्यावसायिकांचे रोजगार पूर्णतः उध्वस्त झालेत व त्यांना येणारे काळात त्यांचे उदरनिर्वाह कसा होईल हा प्रश्न भेडसावत असतांना अवास्तव व जास्तीचे वीजबिल आल्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे

जनतेची दोन वेळच्या भाकरीचा प्रश्न निर्माण झाला असतांना अशा परिस्थितीत विज बिल भरण्याची सोय मुळीच नाही. त्यातच विज बिल कंपनीने जास्तीत आलेल्या बिल बिलामुळे जनतेला आत्महत्येस प्रवृत्ती करायची परस्थिती निर्माण झाली.

चार महिण्न्याचे सरसकट वीज बिल माफ करावे. मुख्यमंत्री मा. ना.श्री उद्धवजी ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत,वर्धा जिल्हाचे पालकमंत्री सुनील केदार यांना तहसीलदार यांच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.

त्यावेळी आर्वी विधानसभेचे माजी आमदार अमर काळे , शेतकरी आरक्षण नेते शैलेश अग्रवाल, राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभा अध्यक्ष गोपालजी मरसकोल्हे, युवा स्वाभिमान पार्टी आर्वी विधानसभा अध्यक्ष दिलीप पोटफोडे, आर्वी विधानसभा व विविध संघटना उपस्थित होते.