July 16, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

गोरसेनेच्या धरणे आंदोलनामुळे शेतकऱ्यांना मिळणार न्याय….!

मजहर शेख

शाखाधिकाऱ्याच्या लेखी आश्वासनाने धरणे आंदोलन मागे…!

नांदेड / माहूर , दि. २९ :- शेतकऱ्यांना पिक कर्ज वाटप तातडीने सुरु करा व वारंवार आधार लिंक फार्म देऊनही बँक खात्याला आधार लिंक करून न देणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्याविरुद्ध कारवाई करा व दलालाना आळा घाला. या मागणीसाठी गोर सेनेतर्फे आज दि. २९ जून २०२० रोजी माहूरच्या भारतीय स्टेट बँक शाखे समोर धरणे आंदोलन करण्यात आले. अनेक शेतकऱ्यांनी वारंवार आपल्या शाखेत बँक खात्याला आधार लिंक करण्याठी फार्म भरून दिलेले असतांना बँक कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे खातेदारांचे आधार लिंक झालेले नाहीत तसेच माहूरच्या भारतीय स्टेट बँक शाखेत कोणतेही काम दलालाशिवाय सुरळीत होऊ शकत नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. दलालाविना येणाऱ्या नागरिकांना वारंवार चकरा मारणे भाग पडत आहे.आधीच कोरोना विषाणूच्या संकटाने नागरिकांना ये-जा करण्यास अडचणी येत असून आर्थिक झळ सुद्धा पोहचत आहे. कोरोना विषाणूमुळे उद्भवलेली विपरीत स्थिती पाहता बँकांनी शेतकऱ्यांबाबत सहानुभूती बाळगावी व तातडीने आधार लिंक करून शेतकऱ्यांना तातडीने खरीप हंगामाचे पिक कर्ज वाटप सुरु करावे व बँकेत वारंवार येणाऱ्या दलालांविरुद्ध कारवाई करावी असा आग्रह गोर सेनेने धरला होता.सदर धरणे आंदोलन थांबविण्यासाठी भारतीय स्टेट बँक शाखा माहूरचे शाखाधिकारी अविनाशकुमार यांनी धरणे मंडपात आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन त्यांच्या सर्व मागण्या पूर्ण करण्यात येतील असे आश्वासन दिले. खात्याला आधार जोडणीचे काम सुरु असून प्राप्त अर्ज छाननी करून आधारलिंक करण्याची प्रक्रिया सुरु असून कुणास काही अडचणी असल्यास त्या ग्राहकाने स्वतः शाखाधिकारी यांना भेटावे असे सांगितले. तर खरीप पिक कर्ज वाटपाची प्रक्रिया सुरु असून इतर पात्र कर्जदारांची यादी तयार करून कर्ज देण्याची प्रक्रिया सुरु केली असल्याचे सांगितले. तर दलालाच्या सूळसुळाटाच्या विषयावर बोलतांना बँक परिसरात असा कोणताही व्यक्ती दलाल नसल्याचे सांगितले त्यावेळी आंदोलनकर्त्यांनी एकच व्यक्ती बँकेत बार बार येतांना दिसतो त्या व्यक्तीची बँक प्रशासनाने सीसीटीव्ही फुटेज तपासून त्याचे किती वेळी काम होते याची तपासणी केल्यास दलाल अपोआप सापडतील असे सांगितले असता या बाबीचा निश्चितच विचार करून दलालांना आळा घालू असे आश्वासन दिले व आम्ही बँक परिसरात दलालापासून सावध राहावे असे दर्शनी भागात फलक लावले असल्याचे आणि कुणी दलाली करण्याचा प्रयत्न केल्यास आम्ही त्याचे विरुद्ध नियमानुसार कार्यवाही करू असे सांगितले. व लेखी आश्वसन दिल्याने गोर सेना तालुकाध्यक्ष प्रफुल जाधव यांनी आंदोलन थांबविले व बँक प्रशासनास सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.

यावेळी तालुका उपाध्यक्ष उकंड पवार, सचिव अर्जुन पवार, कुणाल राठोड, यादव आडे, आकाश राठोड, सुजित आडे, निलेश राठोड, गजानन राठोड, आशिष राठोड, प्रल्हाद राठोड आदी कार्यकर्ते उपस्थित होते. धरणे आंदोलन कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिजिकल डीस्टंसचे पालन करीत व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र तिडके, अण्णासाहेब पवार, पो.हे.कॉ. राठोड, पो.हे.कॉ.गंगाधर खामनकर, पो.कॉ.प्रकाश देशमुख, गजानन इंगळे आदींनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!