Home विदर्भ “महसूल प्रशासनावर वाळूमाफिया शिरजोर” तलाठ्याला दम देणाऱ्या वाळूमाफिया वर महसूल प्रशासन मेहरबान”

“महसूल प्रशासनावर वाळूमाफिया शिरजोर” तलाठ्याला दम देणाऱ्या वाळूमाफिया वर महसूल प्रशासन मेहरबान”

116

मंगरूळ दस्तगीर

अमरावती – धामणगाव रेल्वे तालुक्यात वाळूमाफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून महसूल प्रशासन बघ्याची भूमिका घेत असताना वाळूमाफियांची हिम्मत वाढून अक्षरश तलाठ्याची गाडी कडून धमकी दिल्याची घटना घडून सुद्धा महसूल प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल न केल्यामुळे महसूल प्रशासन व वाळू माफिया यांच्यामध्ये निश्चितच साटेलोटे असण्याची चर्चा ऐकावयास मिळत आहे.

सविस्तर वृत्त असे की काल दुपारी दोन वाजता च्या सुमारास बोरगाव निस्ताने येथील रेती घाटात या विभागाचे तलाठी चव्हाण पाहण्यासाठी गेले असता या रेती घाटात काही मजूर फावडे व टोपले घेऊन रेती उत्खनन करत असल्याचे त्यांना दिसले. तलाठी रेती घट आत येताच सर्व मजूर टोपले व पावडे घाटात सोडून पळून गेले. सदर पत्र वाऱ्याने नंतर सर्व टोपडे व पावडे जप्त करून गावातील पोलीस पाटील यांच्याकडे सुपूर्द केले पटवारी मंगरूळ दस्तगीर च्या दिशेने निघून गेले पटवारी आपल्या शासकीय कर्तव्यावर असताना एक पल्सर गाडी घेऊन आलेल्या व्यक्तीने सदर तलाठ्याला थांबून आमचे पावडर झोपले का जप्त केले अशी विचारणा करून सदर मध्ये धुंद असलेल्या व्यक्तीने तलाठ्याला दम देऊन निघून गेल्याचे सांगण्यात येते.

बोरगाव निस्ताने रेती घाटात रेतीची चोरी सुरू असताना तिथे चोरीसाठी वापरलेले साहित्य जप्त करून सुद्धा वाळू माफियांवर कारवाई न करणे यामध्ये महसूल प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचे दिसून येत आहे पण शासकीय कर्तव्यावर असताना त्याला त्याला अडवून दम लिहिणे व शासकीय कामात अडथळा निर्माण करणे अशी वर्तन करून सुद्धा आहे या प्रकरणाची पोलिसात तक्रार दाखल न केल्यामुळे महसूल प्रशासनाच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून यामधून वाळूमाफियांची हिम्मत वाढून अशा प्रकारचे हल्ले सुद्धा कर्मचाऱ्यावर होऊ शकतात अशी चर्चा जनसामान्यात ऐकण्यास येत असून महसूल प्रशासनावर वाळूमाफिया शिरजोर झाले की प्रशासनाचे व माफियांशी असलेले मधुर संबंध कारणीभुत आहे असा प्रश्न सामान्य जनतेला पडला असून सदर तलाठी हा नवीन रुजू झाल्यामुळे त्याच्यावर आपला धाक निर्माण करण्यासाठी वाळूमाफियांची प्रयत्न असल्याचे बोलले जात आहे.

अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची गय न करता शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या वर तात्काळ कारवाई करावी अशी जनसामान्यांची मागणी आहे .

सदर घडलेला प्रकार माझ्या कानावर आला असून सदर कर्मचाऱ्याचे बया घेऊन शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या ची व कर्मचाऱ्यांना करणाऱ्यांची गय केली जाणार नाही – तहसीलदार भगवान कांबळे

बोरगाव निस्ताने रीती घाटात पाहण्यासाठी गेलो असता काही मजूर रेतीचे उत्खनन करताना दिसले लगेच पावडे टोपले टाकून पळून गेले. ते जप्त करून पोलीस पोलिस पाटलाकडे सुपुर्त केली मंगरूळ दस्तगीर कार्यालयाच्या दिशेने जात असताना एक व्यक्ती माझ्या गाडीला आडवी होऊन आमचे पावडे टोपल्या जप्त का केले ?असे अर्वाच्च भाषेत विचारपूस करून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. मोठ्या आवाजात बोलून निघून गेला.