July 9, 2020

policewalaa

पत्र नव्हे शस्त्र

उमेदद्वारे हायजेनिक मटन शॉपचे उद्घाटन सोहळा

सौ.पदमाताई प्रभाकर मुंजेवार

मागणी नुसार मिळणार घरपोच मटन

लवकरच वार्तानुकुलीत व्हानद्वारे विक्री

वर्धा , दि. 26 – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियान,उमेद तालुका देवळी,जि.वर्धा अंतर्गत विदर्भपशु उन्नती संसाधन केंद देवळी द्वारा हायजेनिक मटन शॉपची उभारणी करण्यात आली आहे. या योजने अंतर्गत पशुसखी व तालुक्यातील पशुपालक यांना एक रोजगार व योग्य दरात पशु विक्री होणार आहे. वर्धा जिल्ह्यातील व राज्यातील हा एकमेव प्रकल्प असून याचे योग्य व्यवस्थापक झाले तर अश्या प्रकारचे राज्यात प्रायोगिक तत्वावर उभारणी करण्यात येणार आहे. देवळी तालुक्यात तयार झालेल्या हायजेनिक मटन शॉपचे उद्घाटन उद्घाटन सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे प्रकल्प संचालक तथा जिल्हा अभियान सहसंचालक वर्धा सत्यजीत बडे, जिल्हा नियोजन अधिकारी अरविंद टेंभूणे, पशुसंवर्धन आयुक्त डॉ. सचिन अलोणे, देवळीचे पशुधन विकास अधिकारी डॉ. संजय खोपडे, उमेदच्या जिल्हा अभियान व्यवस्थापक स्वाती वानखेडे, जिल्हा व्यवस्थापक-मार्केटिंग, मनीष कावडे, तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता भोयर, देवळी, धर्मेन्द तांत्रिक साह्य द गोट ट्रस्ट लखनऊ या मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा पार पडला.

पशुसंवर्धन खात्यामाफर्त हा प्रकल्प उमेद अभियान अंतर्गत विदर्भपशु उन्नती संसाधन केंद देवळी यांना राबविण्याकरिता दिलेला आहे. देवळी येथे जिल्हा वार्षिक नाविन्यपूर्ण योजनेतून हायजेनिक मटन शॉपची उभारणी करण्यात आलेली आहे. साडेबारा लाखांच्या खर्चातून शॉपची संकल्पना पूर्णत्वास आली असून तात्पुरत्या स्वरुपात मोटर बाईक द्वारे सेवा पुरविण्यात येणार आहे. याकरिता डीगडोह रिंगरोडवर लीजवर जागा घेऊन स्लाॅटर हाउसचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. प्रायोगिक तत्वावर सुरु करण्यात आलेल्या या हायजेनिक मटन शॉप म्हणून याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. मटणाची विक्री काही दिवसात वार्तानुकुलीत मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून केली जाणार आहे. संपूर्ण राज्यातून सर्वप्रथम देवळी शहरात मटन शॉपची प्रायोगिक तत्वावर सुरुवात करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान उमेद च्या माध्यमातून या शॉपचे व्यवस्थापन एक हजार चौरस फुट जागेत सहा लाखाच्या खर्चातून स्लाॅटर हाउसचे बांधकाम करण्यात आले. उर्वरित जागेत शेळ्याची राहण्याची व्यवस्था तसेच त्यांच्याकरिता हिरवा चाऱ्यांची लागवड केली जाणार आहे. तालुक्यातील 5000 हजार च्या वर महिला पशुपालक तसेच 65 पशुसखी कार्यरत असणार आहे . अभियान अंतर्गत या स्लाॅटर हाउसची देखभाल विदर्भ पशु उन्नती संस्थान देवळी याच्या देखरेखीखाली मटण विक्री केल्या जाणार आहे या योजनेला तांत्रिक साहाय्य द गोट ट्रस्ट, लखनऊ यांचे सहकार्य लाभणार आहे.

मागणीनुसार देवळी,वर्धा ,सेलू शहरात तसेच तालुक्यातील गावातही मटणाची विक्री केली जाणार आहे. या करिता तालुक्यातून पाचशे बचतगटाच्या माध्यमातून मालाची खरेदी केली जाणार आहे. त्यांच्या उत्पादनाला यशस्वी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अश्या विविध उपाययोजना करून या प्रयोगाला राज्यात उमेदच्या माध्यमातून यशश्वी करण्यात येणार आहे. याकरिता तालुका अभियान व्यवस्थापक ओमलता दरणे,संजय राउत तालुका समन्वयक ,राहुल अतकरेतालुका समन्वयक सेंदीय शेती प्रभाग समन्वयक, किशोर कोल्हे प्रभाग समन्वयक, सामुदायिक पशुधन व्यवस्थापक मनोज चिखलकर ,गौरव मातुरे ,शुभागी कामडी,कांचन होले,कविता भगत, विदर्भ पशु उन्नती संस्थान देवळी स्लाॅटर हाउस अध्यक्ष अरुणा उरकुडे अध्यक्ष ,सचिव अर्चना डंभारे विविध पशु सखी व इतर सहकारी यांच्या मार्फत हि योजना यशस्वी करण्यात येणार आहे.

Posts Slider

website Design by Kavyashilp Digital Media 7264982465
error: Content is protected !!