Home विदर्भ शेतकरी बांधवांना आर्थिक मदत किंव्हा दुबार पेरणी करिता योग्य दर्जाचे बियाणे देण्यात...

शेतकरी बांधवांना आर्थिक मदत किंव्हा दुबार पेरणी करिता योग्य दर्जाचे बियाणे देण्यात यावे – गोर प्रफुल्ल जाधव गोर सेना जिल्हा सचिव

235

गोर सेना च्या वतीने तहसीलदार आर्णी यांच्या मार्फत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.

कोविड-19 महामारिमुळे शेतकरी यांच्यावर आर्थिक संकट उभे असून देखील शेतकरी बांधव जगाला अन्न धान्य पिकावण्या करिता पेरणी करत आहे. पण नेहमी शेतकरी पदरी निराशाच येते अशी गत सध्या जिल्हा मध्ये पाहायला मिळत आहे.
यवतमाळ जिल्हा मध्ये निकृष्ट दर्जाचे बियाणेमुळे उगवण न झाल्याचा असंख्य तक्रारी कृषी अधिकारी कार्यालय,तहसील कार्यालय येथे पडत आहे त्यामुळे आधीच कोंडीत सापडलेल्या शेतकर्यावर दुबार पेरणीचे संकट ओढवलेले आहे प्रमाणित केलेले निकृष्ट दर्जाचे बियाणे पुरवणाऱ्या कंपन्या व महाबीज यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी गोर सेना कडून करण्यात येत आहे. यावेळी जिल्हा सचिव प्रफुल्ल जाधव , संतोष आडे,हिरामण जाधव,जितेश चव्हाण,अर्जुन पवार,राजू राठोड,अनिल पवार आर्णी तालुका पदाधिकारी उपस्थित होते.