Home विदर्भ बॅंक आहे भांब राजाची , “गर्दी मोठी ग्राहकांची”

बॅंक आहे भांब राजाची , “गर्दी मोठी ग्राहकांची”

215

देवानंद जाधव

यवतमाळ – तालुक्यातील भांब राजा येथील अलाहाबाद बॅंकेमध्ये सध्या प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे. शेतकरी, शेतमजुर, विधवा, परितकत्या, निराधार, आदी ग्राहकासह अन्य ग्राहकांची देवान घेवान करण्यासाठी दररोज ये जा असते, माञ अलाहाबाद बॅंक प्रशासन, कोवीड 19 चे दिशा निर्देश बासनात गुंडाळून ठेवत असल्याचे सकृतदर्शनी दिसत आहे.

लाॅकडाऊन शिथिल झाल्याने सर्वच नागरिक मोहोळाच्या माशांसारखे आभाळाच्या छताखाली सैरभैर होऊन फिरत आहे. सामाजिक दुरावा ठेवण्यासाठी प्रशासन आणि शासन जिवापाड प्रयत्न करीत आहे. माञ नाकरीक गांभीर्याने घेत नाही. त्यामुळे जनता जणु बारुद च्या ढिगार्यावर ऊभी असल्याचे वास्तव आहे. प्रत्येक व्यक्ती मला कोरोणा विषाणु ची लागणच होत नाही या भ्रमात आहेत. मागील दोन तिन महीन्या पासुन सर्वच कुलूपबंद अवस्थेत असल्याने, सगळंयांचेच अर्थशास्त्र कोलमडून पडले आहे. दैनंदिन गरजा भागवण्यासाठी बॅंकेत येणे जाणे करणे अपरिहार्य आहे. हे नाकारून चालणार नाही. माञ जिल्ह्यामध्ये कोरोणाग्रस्त रुग्णांचा फुगत चाललेला आकडा रोज दररोज छातीमध्ये धडकी भरवत चालला आहे. प्रत्येक नागरिकाने सामाजिक दुरावा ठेवण्यासाठी, आपल्या सामाजिक ऊत्तरदाईत्वाची जाणीव जागृत ठेऊन, सध्याची परिस्थिती समजून घेणे आवश्यक आहे. शिवाय अलाहाबाद बॅंक प्रशासनाने देखील शासन आणि प्रशासनाने कोवीड संदर्भात दिलेल्या दिशा निर्देशाला बासनात गुंडाळून न ठेवता, प्रसंगी कर्तव्य कठोर होऊन अंमलबजावणी करावी असी समाजातील समजुतदार नागरिकांची अपेक्षा आहे. आणि काही उताविळपणा करणार्या नागरिकांनी देखील कोरोणाच्या बैलगाडी ला वंगन (तेल)टाकु नये,पण निदान खिळी तरी काढु नये असे या गंभीर परिस्थितीच्या निमित्ताने सांगावेसे वाटते. बघा तुम्हाला काय वाटतयं ते.