Home विदर्भ राज्य सरकार व महा वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य माणसाच्या खिशावर दरोडा –...

राज्य सरकार व महा वीज वितरण कंपनीकडून सर्वसामान्य माणसाच्या खिशावर दरोडा – संभाजी ब्रिगेड

115

यवतमाळ , (वासीक शेख) – महावितरण कंपनी तीन महिन्यात लाईट बिल पाठवले नाही. त्यामुळे बऱ्याच लोकांनी वीज बिल भरलेले नाही. उन्हाळा व लाॕकडाऊन असल्याने तीन महिन्यात वापरलेली वीज अंदाजे तीनशे युनिटच्या वर गेलेली आहे. याचा अर्थ विज बिल मिळालं नसल्यामुळे विनाकारण तीनशे युनिटच्यावर विज बिल रक्कम अर्थात जास्तीचा भरणा सामान्य माणसाला करावा लागणार आहे. 100 युनिट च्या आत 3.46 रू. एवढा वीज आकार आहे. 101 ते 300 युनीट – 7.43रूपये, 300 ते 500 युनीट 10.32रू व 500 ते 1000 च्या पुढे 11.71 रूपये इतका वीज आकार (रेट) आहे. मात्र तीन महिन्याचे एकत्रित वीजबिल आल्यामुळे सरसकट सगळ्या नागरिकांना जास्तीच्या विज आकार (किंमत) बिल भरावे लागेल.महावितरण कंपनीने प्रत्येक महिन्याला बिल न पाठवल्यामुळे बऱ्याच नागरिकांनी वीज बिल भरलेले नाही. त्यांना आता तीन महिन्याचा जास्तीचा भुर्दंड सामान्य नागरिकांच्या खिशावर वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे उदंड बसणार आहे.बिल पाठवणे ही कंपनीची चूक आहे. असे असताना त्याची झळ सामान्य माणसांनी का भरायचे हा आर्थिक भुर्दंड सामान्य लोकांनी का भरायचा हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री व ऊर्जामंत्री यांनी यामध्ये तात्काळ तडजोड करून सरसगट तीन महिन्याचे वेगवेगळे पैशांनी विज भरणा करून घ्यावा हा सामान्य नागरिकांच्या खिशावर पडलेला दरोडा आहे. हे विज बिल रद्द करा किंवा तिन महिन्याचे विजबील माफ करा… अन्यथा संभाजी ब्रिगेड तीव्र आंदोलन करणार आहे.

यवतमाळ_जिल्ह्यासह महाराष्ट्रात कोरोनाचे संकट महाभयानक आहे. त्यात यवतमाळ रेडझोन मध्ये असल्याने परिस्थिती अत्यंत प्रचंड कठीण काळ आहे.

शेतकरी, सामान्य नागरिकांसह छोटे उद्योग व्यवसाय अडचणीत आले असून दैनंदिन जीवन व्यवस्था उध्वस्त झालेली आहे. अशा काळात बहुतेक लोक स्वतः भाड्याने राहत आहेत किंवा त्यांचे छोटे-मोठे उद्योग व्यवसाय हे भाड्याच्या दुकानांमध्ये सुरू आहेत. असे लोक या लाॕकडाऊन या काळामध्ये प्रचंड अडचणीत आहेत. म्हणून राज्य सरकार व मा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांना संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने विनंती आहे की, लाॕकडाऊन जाहीर झाल्या पासून अर्थात मार्च २०२० पासून मे २०२० महिन्यापर्यंतची सर्व ‘लाईट बिल’ माफ करावेत… अशी संभाजी ब्रिगेड यवतमाळ जिल्ह्याच्या वतीने विनंती करण्यात येत आहे. याबाबतची मागणी चे पत्र आपणास व आपल्या कार्यालयात आम्ही ई-मेल द्वारे पाठवत आहे.

तीन महिन्याचे_वीज बिल माँफ करा संभाजी ब्रिगड

विधानसभेच्या काळात काँग्रेसने 100 युनिटपर्यंत विज बिल माफ करू असे जाहीरनाम्यात सह भाषणामध्ये जाहीर केलेले आहे.मात्र सत्तेवर येऊन सुध्दा आजपर्यंत अंमलबजावणी झालेली नाही. दिल्लीमध्ये 100 युनिटपर्यंत वीज मोफत आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात सुद्धा 100 युनिटपर्यंत वीज सर्वांना सरसगट मोफत मिळाली पाहिजे. मात्र सध्या कोरोनाचे संकट भयानक व महामारी स्वरूपात असल्यामुळे सर्व जण अत्यंत अस्वस्थ आहेत. त्यामुळे कोरोना महामारी च्या धर्तीवर मार्च महिन्यापासून ३ महिन्याचे सर्वांचे लाईट बिल अर्थात ‘वीज बिल माफ’ करावे अशी संभाजी ब्रिगेडच्या वतीने विनंती करण्यात आली आहे.निवेदन देताना सुरज खोब्रागडे,जिल्हाध्यक्ष,संभाजी ब्रिगेड,अनिकेतभाऊ मेश्राम ,सूरज पाटिल, सचिन मनवर,किशोर ठाकरे,निहार गाडगे,चेतन भगत,शुभम पतोडे, रोहित लोहकरे, दिक्षाताई नग्राले, प्राजक्ताताई भोयर, ई.पदाधिकारी उपस्तिथ होते.