Home सातारा प्रामाणिक कार्यकर्ता हीच माझी दौलत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर

प्रामाणिक कार्यकर्ता हीच माझी दौलत माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर

121

मायणी – सतीश डोंगरे

सातारा – सध्या अनेक राजकीय नेत्यांकडे प्रामाणिक कार्यकर्त्यांचा वनवा आहे एका निवडणुकीत आपल्या सोबत असेल तर कार्यकर्ता दुसऱ्या निवडणुकीत दुसऱ्या चा झेंडा घेऊन फिरताना आपण पाहतो परंतु 2009 पासून कोणतीही राजकीय सत्ता नसताना माझा कार्यकर्ता प्रामाणिकपणे माझ्या जवळ राहीला जे हाताच्या बोटावर मोजण्याइतके कार्यकर्ते बाहेर गेले ते परत स्वाभिमानाने माझ्याकडे आले प्रामाणिक कार्यकर्ता हीच माझी धनदौलत आहे.
मी नेता जरूर आहे पण कार्यकर्त्यांच्या जीवावर आणि त्यांच्या आत्मविश्वासावर अनेक विकास कामे खेचून आणली आहेत माझ्याकडे शेती नाही पण शेतकऱ्यांच्या पाटात पाणीआणल्याशिवाय मी निवांत बसणार नाही मला माझ्या संघटनेचा अभिमान आहे कावळ्याने कितीही चोच मारली तरीही पर्वत हलत नाही अशी माझी संघटना आहे असे उदगार खटाव माणचे माजी आमदार डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांनी प्रभाग 6 मध्ये विविध विकास कामाच्या उद्घाटन व अनेक कामाच्या शुभारंभ प्रसंगी मायणी येथे बोलताना काढले याप्रसंगी युवा नेते सरपंच सचिन गुदगे व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
विकास कामे करनाऱ्याची ची पाठराखण करावी,असे मत युवा नेते सचिन गुदगे यांनी केले ते म्हणाले की गेल्या तीन वर्षात केवळ मायणी तच नव्हे तर संपूर्ण जिल्हा परिषद गटात करोडो रुपयांची कामे संघटनेच्या जोरावर करू शकलो नुसते प्रभाग 6 मध्ये सांगायचे झाले तर 25;15 मधून बंदिस्त गटारे रस्ता स्मशानभूमी वेटिंग शेड ही कामे मंजूर करून पूर्ण करण्यात यशस्वी झालो साकव पूल मंजूर करून तो पूर्णही केले त्याचे लोकार्पण डॉक्टर दिलीपराव येळगावकर यांच्या हस्ते पार पडले तसेच 14 व्या वित्त आयोगातून स्मशानभूमी शेड ,कंपाउंड मंजूर करून त्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते पार पडले यापुढेही वेव्हर रस्ता व्यायामशाळा बंदिस्त गटारे हाय मास्टर पोल इ. कामे करणार असून कामात तूसभर देखील कमी पडणार नाही असे आश्वासन यांनी आपल्या भाषणात दिले या कार्यक्रमास उपसरपंच आनंदा शेवाळे ग्रामपंचायत सदस्य जगन्नाथ भिसे सुरज पाटील विजय कवडे अनिल पाटोळे विजय देशमुख नितीन झोडगे सुदाम भिसे सूरज जाधव केशव पाटोळे तुषार भिसे सावकार पाटोळे गणेश भिसे नंदू कांबळे राजू कचरे धनाजी पाटोळे सुरज भिसे सावकार पाटोळे व ग्रामस्थ उपस्थित होते शेवटी सुदाम भिसे यांनी आभार मानले.